लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरची आजपासून सुरुवात

By Admin | Published: June 6, 2014 12:51 AM2014-06-06T00:51:29+5:302014-06-06T01:11:52+5:30

औरंगाबाद : पालक व विद्यार्थी चातकाप्रमाणे ज्याची वाट पाहत होते त्या लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरला ६ जूनपासून प्रारंभ होत आहे.

Launch of Lokmat Aspire Education Fare today | लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरची आजपासून सुरुवात

लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरची आजपासून सुरुवात

googlenewsNext

औरंगाबाद : पालक व विद्यार्थी चातकाप्रमाणे ज्याची वाट पाहत होते त्या लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअरला ६ जूनपासून प्रारंभ होत आहे. उल्लेखनीय म्हणजे राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था यानिमित्ताने एकाच छताखाली येत आहेत. यामुळे दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्थेची माहिती घेण्यासाठी आता शेकडो मैल प्रवास करण्याची गरज नाही. हे प्रदर्शनच आपल्या पाल्याच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरेल.
जालना रोडवरील सेन्ट फ्रान्सिस हायस्कूल मैदानावर सकाळी ११ पासून प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू बी.ए. चोपडे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनाचे प्रायोजक नारायणा आयआयटी, पीएमटी अकॅडमी हे आहेत.
प्रदर्शनात राज्यातील नामांकित महाविद्यालये, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्टचर, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजरमेंट, फॉरेन लँग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र स्टॉल आहेत. प्रत्येक कोर्सची सविस्तर माहिती व सोबत माहितीपत्रकही दिले जाईल. यानिमित्ताने एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
प्रदर्शन ८ जूनपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील. सर्व पालक व विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोेजकांनी केले आहे.
जिंका, दर तासाला
चांदीचे नाणे
वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनाला भेट देणारे विद्यार्थी व पालक यांच्यातून दर तासाला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यात भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे भेट दिले जाईल.
गुणवत्तेचा गौरव
सीबीएसई दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत सोबत आणावी व प्रदर्शनात आयोजकांना द्यावी.
आजचे चर्चासत्र
सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत
सौम्य दत्तगुप्ता (इंडस स्कूल)
२१ व्या शतकातील शिक्षण पद्धती
सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत
संतोष रासकर (सुजन अ‍ॅनिमेशन)
अ‍ॅनिमेशनमधील करिअर
सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत
पूजा देशपांडे, संदीप पाटील, मनोज परमार (अनुभूती स्कूल)
उत्तम शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास

Web Title: Launch of Lokmat Aspire Education Fare today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.