सेंद्रिय शेती प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:50+5:302020-12-17T04:24:50+5:30
शिबिर उद्घाटनप्रसंगी प्रशिक्षक भास्कर मगरल म्हणाले की, देशातील दोन राज्यांत हे सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंग करीत आहे. ...
शिबिर उद्घाटनप्रसंगी प्रशिक्षक भास्कर मगरल म्हणाले की, देशातील दोन राज्यांत हे सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन आर्ट ऑफ लिव्हिंग करीत आहे. केंद्र सरकारची यासाठी मदत मिळत असून, शेतकऱ्यांची विशेषतः आदिवासी शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी. त्यांचे जीवनमान सुधारावे, हा प्रमुख उद्देश आहे. आज देशातील शेतकरी संघटित नसल्याने अनेक घटकांकडून त्यांची लूट केली जात आहे. ही लूट थांबवून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतीमालाला चांगली मागणी निर्माण कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी शेती समूहाचे अध्यक्ष कृषिभूषण अजय जाधव यांनीदेखील मार्गदर्शन केले. यावेळी गोपाळ काळे, अशोक शाब्दे, शरद डोल्हारकर, परशुराम महात्मे, सुनील बोरबणे, प्रकाश कदम, हरिवंश सिसोदे, नरेंद्र रत्नपारखी, किरण बोराळकर, अंकुश गरड आदींची उपस्थिती होती.