अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:05 AM2021-02-05T04:05:36+5:302021-02-05T04:05:36+5:30
सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवारी लहान मुलांना पोलिओचा डोस पाजून ...
सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयात महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवारी लहान मुलांना पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयाला अधिक सुविधांसह नवीन रुग्णवाहिका दिली जाईल तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर भरती केली जाईल. तसेच जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबाचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबूराव मोरे, शेख सलीम हुसेन, सुधाकर पाटील, मतीन देशमुख, सत्तार हुसेन, मनोज झंवर, डॉ. दत्ता भवर, विशाल जाधव, मोहमद हनिफ, दीपाली भवर, डॉ. अब्दुल समद आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात लहान बालकाला पोलिओ डोस देताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अब्दुल समीर व मान्यवर.