कृषी विभागाकडून रयत बाजार अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:09 AM2021-02-20T04:09:52+5:302021-02-20T04:09:52+5:30

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ अंतर्गत नाचनवेल विभागात एकूण आठ शेतकरी गटांनी नोंदणी केलेली आहे. या सर्व गटांतील शेतकऱ्यांनी ...

Launch of Rayat Bazar Abhiyan by Agriculture Department | कृषी विभागाकडून रयत बाजार अभियानाचा शुभारंभ

कृषी विभागाकडून रयत बाजार अभियानाचा शुभारंभ

googlenewsNext

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ अंतर्गत नाचनवेल विभागात एकूण आठ शेतकरी गटांनी नोंदणी केलेली आहे. या सर्व गटांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उत्पादित केलेला भाजीपाला व शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ तर ग्राहकांना वाजवी दरात ताजी फळे व भाज्या उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच छायाबाई थोरात, उपसरपंच प्रभाबाई राजपूत, मंडळ कृषी अधिकारी पी. एस. सरकलवार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अनिल ठाकरे, सहायक व्यवस्थापक आनंद रहाणे, कृषी सहायक एन. आर. खाडे, रयत बाजारचे समन्वयक गणेश राजपूत, कृषिमित्र नंदा राजपूत आदी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : नाचनवेल येथे संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित शेतमालाच्या थेट विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.

180221\vijay thorat_1613648255846_img-20210218-wa0030_1.jpg

नाचनवेल येथे संत शिरोमणी सावता माळी नाचनवेल येथे रयत बाजार अभियान व 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित शेतमालाच्या थेट विक्रीचा शुभारंभ करण्यात आला.

Web Title: Launch of Rayat Bazar Abhiyan by Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.