सखी मंच सदस्यता नोंदणीचा औरंगाबादेत आजपासून शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:57 PM2018-01-14T23:57:31+5:302018-01-14T23:57:38+5:30

मागील वर्षी सखी मंचने विविध कार्यक्रम घेऊन आठवणींचा एक समृद्ध ठेवा तुम्हाला सोपविला आहे. सोमवार, दि.१५ जानेवारीपासून सखी मंचची २०१८ यावर्षासाठीची सखी मंच सदस्यता नोंदणी मोठ्या थाटात सुरू होणार आहे. तेव्हा संक्रांतीच्या दुसºया दिवशीचा मुहूर्त पकडा आणि लवकरात लवकर पहिल्याच दिवशी नावनोंदणी करून सखी परिवारात सामील व्हा. आज (दि.१५) स. ११ वाजेपासून लोकमत रिगल लॉन (प्रवेश समोरील गेटने) येथे सदस्यता नोंदणीस सुरुवात होत आहे.

Launch of Sakha Forum membership registration from Aurangabad today | सखी मंच सदस्यता नोंदणीचा औरंगाबादेत आजपासून शुभारंभ

सखी मंच सदस्यता नोंदणीचा औरंगाबादेत आजपासून शुभारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मागील वर्षी सखी मंचने विविध कार्यक्रम घेऊन आठवणींचा एक समृद्ध ठेवा तुम्हाला सोपविला आहे. सोमवार, दि.१५ जानेवारीपासून सखी मंचची २०१८ यावर्षासाठीची सखी मंच सदस्यता नोंदणी मोठ्या थाटात सुरू होणार आहे. तेव्हा संक्रांतीच्या दुसºया दिवशीचा मुहूर्त पकडा आणि लवकरात लवकर पहिल्याच दिवशी नावनोंदणी करून सखी परिवारात सामील व्हा. आज (दि.१५) स. ११ वाजेपासून लोकमत रिगल लॉन (प्रवेश समोरील गेटने) येथे सदस्यता नोंदणीस सुरुवात होत आहे.
केवळ पाचशे रुपये भरून सोन्याची ठुशी, सोन्याची साखळी, सोन्याचे कानातले, डायनिंग टेबल, मिक्सर, मोत्याचे दागिने, सोलार सिस्टीम, आटा चक्की, ब्युटी कूपन्स, चिमणी यासारख्या कित्येक वस्तू भाग्यवान सोडतीद्वारे जिंकण्याची संधी मिळू शकते, असे कोणी सांगितले, तर क्षणभर खरे वाटणार नाही; पण मैत्रिणींनो सखी मंचने तुमच्यासाठी ही स्वप्नवत वाटणारी संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी केवळ सखी मंच सदस्यता नोंदणी करणे, एवढे एकच सहजसोपे काम तुम्हाला करायचे आहे.
तुम्हाला माहितीच आहे की, आजवर प्रत्येक वर्षी सखी मंचने आपल्या परिवारात अनेक नव्या मैत्रिणींना सामावून घेत सखीचा परिवार दिवसेंदिवस वृद्धिंगत केला आहे.
सखींच्या या विशाल वटवृक्षाखाली येऊन अनेक सुवर्ण संधींचा लाभ घेण्याची आणि वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. यासोबतच मनोरंजनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा, खेळ, व्यक्तिमत्त्वविकासाची संधी, लावणीचा तडका, नाटकाची धमाल, आवडत्या सिनेकलाकारांशी गप्पा-टप्पा, अशा विविधरंगी कार्यक्रमांची धमाल तुम्हाला यावर्षी अनुभवता येणार आहे.
केवळ ५०० रुपये भरून यावर्षीसाठी सखी मंचचे सदस्यत्व मिळणार आहे आणि सोबत अंजली किचनचा कॉम्बो रु. ७७५ चा किचन सेट, सोनरूपमतर्फे जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलर्स, एक ग्रॅम गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र कूपन, ‘जागर स्त्रीशक्तीचा’ हे पुस्तक, सखी मंच ओळखपत्र, बांगड्या, कर्णफुले आणि सॅम्पल भेळ. जुन्या सखी मंच सदस्यांना नोंदणी शुल्कात ५० रुपयांची सूट मिळेल. याकरिता २०१७ चे सखी मंच ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
राज्यस्तरीय गोल्डन धमाका
सखी मंच सदस्यांसाठी काढण्यात येणाºया राज्यस्तरीय भाग्यवंत सोडतीमध्ये पहिले बक्षीस १,५१,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, दुसरे बक्षीस १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तिसरे बक्षीस ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तिसरे बक्षीस ५१ हजार रुपयांचे दागिने, ११,००० रुपये किमतीचे उत्तेजनार्थ बक्षीस.
लावणी आणि नाटकाचा बहारदार कार्यक्रम
सखींसाठी यावर्षीची सुरुवात अगदी धूमधडाक्यात होणार आहे. दि.३१ जानेवारी रोजी दु. ४ वा. ‘एकापेक्षा एक अप्सरा’ या बहारदार लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.२ फेबु्रवारी रोजी ‘चोरीचा मामला’ हे धमाकेदार कॉमेडी नाटक सादर होणार आहे. तेव्हा सखींनो लवकरात लवकर नावनोंदणी करा आणि या दोन्ही कार्यक्रमांचा आनंद लुटा.
सखी मंच सदस्यता नोंदणी खालील ठिकाणी
स. ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत चालू असेल
लोकमत भवन, रिगल लॉन, जालना रोड.
मिलन मिठाई, उस्मानपुरा, मछली खडक.
आकर्षक बुटिक (सोमवारी बंद राहील),समर्थनगर.
सुंदर टी कंपनी, विमलनाथ जैन मंदिराजवळ, जाधवमंडी.
नूतन अडसरे ९८२३९६६२५४, आरएम २५६, जयभवानी चौक, कोलगेट कंपनीसमोर, बजाजनगर.
श्री कुकिंग अ‍ॅण्ड हॉबी क्लासेस (८७८८३८५७८८, ८४२१०१९७८४), उल्कानगरी, रिद्धीसिद्धी हॉलजवळ.
श्री साई हॅण्डरायटिंग (८७६९२३७३६८), एसबीओए पब्लिक स्कूलसमोर, मयूरपार्क, जळगाव रोड.
श्री साई हॅण्डरायटिंग, प्राईम क ॉम्प्युटरजवळ, एम-२ रोड, टी.व्ही. सेंटर, हडको.
जयेश मेडिकल (९८२३३४१३५१), विठ्ठल विशाखा कॉम्प्लेक्स, नंदनवन कॉलनी.
गोली वडापाव (९५२७९८८६४४), सूतगिरणी रोड, गुरुकृपा फरसान मार्टजवळ.
काव्या डिजिटल स्टुडियो (७६२०५३०३१३), एन-२, एम-२-२५-१, रामनगर.
स्मार्ट बोल स्पोकन अ‍ॅण्ड सॉफ्ट स्कि ल ट्रेनिंक सेंटर (९८५०३०४६५५), प्लॉट नं. ६, सुयोग कॉलनी, स्टेशन रोड.
एलएसएम सुपर मार्के ट (९४२०४०१८१८), सूर्यालॉनजवळ, अरुणोदय कॉलनी, बीड बायपास.
सखी मंच सदस्यता नोंदणीसोबत मिळणार ४,५०० रुपयांच्या हमखास वस्तूंचे कूपन
१ साडी ड्रायक्लीन करण्याची संधी, फ्रु ट फेशिअल किंवा हेअरकट, हेल्दी हेअर पॅक, मसाले, ८ दिवसांचे स्पोकन इंग्रजी क्लासेस, गोल्ड फेशिअल, हेल्थ चेकअप, चटपटीत पराठे, १००० रुपये किमतीचे व्हॅल्यू कार्ड.
रवी मसाले, भाग्य विजय, हर्षा अ‍ॅण्ड संजय हे सखी मंच मेम्बरशिपचे ड्राईव्ह पार्टनर्स आहेत.

Web Title: Launch of Sakha Forum membership registration from Aurangabad today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.