शौचालयाचे अनुदान लाटणे भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:37 AM2017-08-01T00:37:44+5:302017-08-01T00:37:44+5:30
बीड : शहरात अनुदान लाटून शौचालये न बांधणाºया ११ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात अनुदान लाटून शौचालये न बांधणाºया ११ जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यासंदर्भात पालिकेने पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बीड पालिकेने कारवाईची मोहीम चालू केली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांसाठी केंद्र शासनाचे ४, राज्य शासनाचे ८, तर बीड पालिकेतर्फे ५ हजार असे एकूण १७ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शहर पाणंदमुक्त करण्याच्या दृष्टीने पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे; परंतु अनेकांनी शौचालये न बांधताच अनुदानाचा पहिला हप्ता उचलल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. यावर मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांनी स्वच्छता निरीक्षकांकडून अनुदान लाटणाºयांची यादी मागविली. यामध्ये बारादरीनगर भागातील तब्बल ११ लोकांनी शौचालये न बांधताच अनुदान लाटल्याचे उघडकीस आले. स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव यांनी मुख्याधिकाºयांसमोर अहवाल सादर करून शहर पोलीस ठाण्यालाही गुन्हे दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. मुंबई पोलीस अधीक्षक १९५१ चे कलम ११५ व ११७ नुसार अनुदान लाटणाºयांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘शौचालये न बांधताच लाटले अनुदान’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले व अनुदान लाटणाºयांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली.