संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास नेते सरसावले

By Admin | Published: September 13, 2014 11:00 PM2014-09-13T23:00:29+5:302014-09-13T23:13:37+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड विधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे.

Leaders are invited to cheat the office bearers | संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास नेते सरसावले

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास नेते सरसावले

googlenewsNext


व्यंकटेश वैष्णव , बीड
विधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे. ते नेते आपापल्या मतदार संघाकडे रवाना झाले आहेत. प्रचारासाठी कमी दिवस हातात असल्यामुळे उमेदवारांनी इतर प्रचार साधनांबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांची यादी मिळवून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न संभाव्य उमेदवार आपापल्या मतदार संघात करत असल्याचे चित्र बीड जिल्हयात पहावयास मिळत आहे़
विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक बीड जिल्हयात एकाच वेळी होत आहे़ शुक्रवारी आदर्श आचारसंहिता शुक्रवारी जाहीर झाली़ आता पर्यंत मुंबईत दबा धरून बसलेले नेते आता हळूहळू मतदार संघाकडे प्रस्थान करत असल्याचे पहावयास मिळत आहे़ प्रचारासाठी बारा-तेरा दिवस हातात असल्याने जलद प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहचू शकतो यासाठी नवनविन क्लृप्त्या राबविल्या जात आहेत़ याचाच एक भाग म्हणून काही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी बीड जिल्हयातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची यादी करून संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे काम हाती घेतलेले आहे़ बीड जिल्हयात दोन ते अडीच हजाराच्या जवळपास सामाजिक व सेवाभावी विविध संघटना आहेत़
मागील पाच वर्षात सामाजिक संघटनांकडे ढुंकुनही न पहाणारे नेते आता मतासाठी सामाजिक व सेवाभावी संघटनेच्या प्रमुखांना गोजांरत असल्याने संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे़यावेळी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुक एकत्रीत होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार होण्याची चिन्हे बीडमध्ये सध्या पहावयास मिळत आहे. असे असताना सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे वापरण्याच्या तयारीत आहेत. ज्या- ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. ते इतर वेळी मुंबईत तळ ठोकून असणारे संभाव्य उमेदवार आचारसंहिता जाहीर होताच आपापल्या मतदारसंघाकडे रवाना होताना पहावयास मिळत आहेत. प्रचारासाठी बारा ते तेरा दिवसच हातात असल्याने व ते कमी पडत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक सामाजिक संघटनांचे जाळे गावागावांमध्ये विस्तारलेले आहे. याची पुरती कल्पना धुरंधर राजकारण्यांना आहे. यामुळे कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी संघटनांची मदत घेता येऊ शकते का याची चाचपणी सुरू आहे.
मात्र सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते देखील आलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना हो- हो म्हणून वाटेला लावताना दिसत आहेत. असे चित्र सध्या तरी बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

Web Title: Leaders are invited to cheat the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.