दिग्गज् नेतृत्व हरपले..

By Admin | Published: February 17, 2015 12:14 AM2015-02-17T00:14:29+5:302015-02-17T00:38:56+5:30

आदर्श लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला स्वच्छ, संवेदनशील लोकनेता हरपला ! संवेदनशील, विनम्र व अभ्यासू नेत्याला राज्य मुकले

Leadership Leadership .. | दिग्गज् नेतृत्व हरपले..

दिग्गज् नेतृत्व हरपले..

googlenewsNext




४आर. आर. पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते एक अभ्यासू आणि संवेदनशील आणि विनम्र असे नेते होते. जि, प. सदस्य, आमदार, मंत्री आणि उपमुख्यमंत्री अशी त्यांची चढती कारकिर्द होती. सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते म्हणून मंत्रिमंडळात ते परिचित असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल आपलेपणा होता. त्यांनी संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरु करुन अंमलात आणली होती. ते राज्याच्या कायम स्मरणात राहतील.
- माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख.
आर. आर. पाटील यांच्या निधनाने आदर्श लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. ते महाराष्ट्राचे आबा होते. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करीत होता. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता. ते समाजकारणी होते. राजकारणात अनेक विधायक गोष्टी त्यांनी केल्या. स्वच्छता योजना अनेक गावात स्वच्छतेचा तर तंटामुक्तीतून तंटामुक्तीचा वसा दिला. - माजी खासदार जनार्दन वाघमारे
महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय राजकारणी म्हणून आर. आर. पाटील सर्वपरिचित होते. स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक माणूस म्हणून त्यांनी आपली प्रतिमा आयुष्यभर जपली. साहेबांबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. आमचे घरगुती संबंध होते. अनेक वेळा आम्ही सुखदु:ख एकत्र पाहिले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील एक दिग्गज् नेतृत्व, फर्डा वक्ता, स्वच्छ आणि कल्पक नेता हरपला आहे. - आ. अमित देशमुख
लातूर : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या जाण्याने राज्यातील लोकनेता हरपला अशा शब्दात लातुरकरांनी श्रध्दांजली अर्पण केली. सोमवारी विविध पक्ष-संघटनांच्या वतीने आर.आर. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सामान्यांचे लोकनेते
सामान्यांचे असामान्य लोकनेते आबा होते. ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान अशा महत्वपूर्ण योजना राज्याला देणारे नेतृत्व हरवले आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणी आर.आर. पाटलांची होती. त्यामुळेच ते लोकप्रिय झाले.
-आमदार विक्रम काळे
आर. आर. पाटील यांच्या रुपाने राज्यातील अस्सल मातीतल्या नेतृत्वाने राज्यातील जनतेला अलविदा केला आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. तासगावसारख्या गावातून पुढे येत आर. आर. पाटील यांनी वक्तृत्व आणि ग्रामस्वच्छतेसारख्या योजनांमधून आपली राज्यावर छाप सोडली होती.
- माजी आमदार वैजनाथ शिंदे
सामान्य जनतेचा आधारवड हरपला
राज्यातील सर्वसामान्य जनतेचा आधारवड आर. आर. पाटील यांच्या जाण्याने हरपला आहे. त्यांनी पक्षाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांच्या जाण्याने पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. - डी. एन. शेळके, जिल्हाध्यक्ष, राकाँ.

Web Title: Leadership Leadership ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.