एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:54 PM2019-01-17T18:54:03+5:302019-01-17T18:54:17+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे.
वाळूज महानगर : बजाजनगरसह परिसरातील नागरी वसाहती व औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बजाजगेट-वाल्मी रस्त्यावर गळती लागली आहे. दुरुस्तीकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुरुस्तीअभावी दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील नागरी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने जायकवाडी धरणातून पैठण ते वाल्मी-बजाजगेट रस्ता मार्गे एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकली आहे. येथूनच बजाजनगरसह सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, पंढरपूर, वडगाव, जोगेश्वरी आदी गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा करणाºया याच मुख्य जलवाहिनीला वाल्मी-बजाजगेट रस्त्यावर पाटोदा गावालगत असलेल्या पुलाजवळ गळती लागली आहे. याचा औद्योगिक क्षेत्र व नागरी वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे.
वसाहतींना दूषित पाणीपुरवठा ..
एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. पण एमआयडीसी प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गळतीमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. गळतीच्या साचलेल्या पाण्यात कुत्रे, डुकरे बसत असून पुन्हा तेच पाणी जलवाहिनीच्या पाण्यात मिसळत असल्याने याच दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.