शौचालय वापरणारे ‘लयभारी’
By Admin | Published: May 3, 2016 01:00 AM2016-05-03T01:00:52+5:302016-05-03T01:05:58+5:30
नांदेड : जिल्ह्यात १ जून २०१६ नंतर ज्या कुटंबाकडे शौचालय बांधलेले नसेल अशा कुटुंबांच्या घरावर लाल रंगाचे खतरा धोका असलेले स्टीकर्स लावण्यात येतील,
नांदेड : जिल्ह्यात १ जून २०१६ नंतर ज्या कुटंबाकडे शौचालय बांधलेले नसेल अशा कुटुंबांच्या घरावर लाल रंगाचे खतरा धोका असलेले स्टीकर्स लावण्यात येतील, तर शौचालय वापर करणाऱ्यांच्या घरावर लयभारी नावाचे हिरव्या कलरचे स्टीकर्स लावण्यात येतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिली.
हागणदारीमुक्तीसाठी जिल्ह्यात शौचालय बांधकामाचे मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी व मिनी बीडीओ हे गावामध्ये मुक्कामी राहून ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक तालुक्यातून ६० टक्के गावांची निवड करुन ही गावे जुलै अखेर तर उर्वरित गावे २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. गावातून शौचालय बांधकाम व शौषखड्यांचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक वार्डनिहाय गावातील महत्वाच्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यांचे मिनी बीडीओ नियोजन करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन कक्षामार्फत शौचालय नसलेल्या कुटुंबांच्या घरावर लाल रंगाचे खतरा स्टीकर्स लावण्यात येणार आहेत. ज्या कुटंबांकडे शौचालय आहे व कुटंबातील सर्व सदस्य शौचालयाचा वापर करातात. अशा घरावर लयभारी नावाचे हिरव्या कलरचे स्टीकर्स लावले जातील. तसेच ज्यांच्याकडे शौचालय असून कुटुंबातील काहीच सदस्य त्याचा वापर करीत असतील अशांच्या घरावर पिवळ््या रंगाचे फिप्टी - फिप्टी - फिप्टी लिहलेले स्टीकर्स लावण्यात येणार आहेत.
गेल्या १५ दिवसापासून ग्रामसेवकांना पाणीटंचाई, शौचालय बांधकाम तसेच शौषखड्ड्यासाठी दररोज ग्रामपंचायतीमध्ये जावे असे स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी दिले आहेत. जे ग्रामसेवक गावात येत नाहीत त्यांची नावे ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांच्याकडे कळवावीत.
२०१६-१७ या चालू वर्षात शौषखड्यासह शौचालय बांधकामाची मोहीम गतिमान करण्यात येणार आहे. येत्या २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे. याकामी ग्रामीण भागातील नागरिकांनी सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ, निर्मल, हागणदारीमुक्त, डासमुक्त करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगला गुंडले, मुख्य कार्यकारी अधिकारी काळे, आरोग्य सभापती संजय बेळगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामोड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)