शिकाऊ परवान्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:03 AM2021-01-20T04:03:27+5:302021-01-20T04:03:27+5:30
सर्व्हर डाऊन : चाचणीशिवाय माघारी जाण्याची वेळ औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात शिकाऊ परवाण्याच्या (लर्निंग लायसन्स) यंत्रणेचे सर्व्हर डाऊन झाल्याने ...
सर्व्हर डाऊन : चाचणीशिवाय माघारी जाण्याची वेळ
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात शिकाऊ परवाण्याच्या (लर्निंग लायसन्स) यंत्रणेचे सर्व्हर डाऊन झाल्याने मंगळवारी १५० उमेदवारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी ८ वाजेपासून आलेले आलेले शिकाऊ वाहनचालक दुपारी १२ वाजेपर्यंत ताटकळत होते. अखेर चाचणीशिवायच त्यांना कार्यालयाबाहेर पडावे लागले.
आरटीओ कार्यलयात शिकाऊ परवान्यासाठी दररोज दोनशे जणांची चाचणी घेतली जाते. चाचणी देण्यासाठी उमेदवारांना अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून उमेदवार आरटीओ कार्यालयात हजर झाले होते. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने चाचणीची प्रक्रिया सुरू होत नव्हती. एक-एक तास उलटूनही यंत्रणा सुरळीत झाली नाही. तर दुसरीकडे अपॉइंटमेंटच्या वेळेनुसार उमेदवार दाखल होत होते. त्यामुळे शिकाऊ परवाना विभागासमोर एकच गर्दी झाली होती. अनेक जण पालकांसह दाखल झाले होते. चाचणी प्रक्रिया कधी सुरळीत होणार अशी विचारणा करीत प्रत्येक जण अधिका-यांकडे धाव घेत होता. अखेर दुपारी १२ वाजता चाचणी घेणे शक्य होणार नसल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी चाचणी, अपॉइंटमेंटची गरज नाही
सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चाचणी होऊ शकली नाही. त्यामुळे या उमेदवारांची आता सुटीच्या दिवशी शनिवारी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना अपॉइंटमेंट घेण्याचीही गरज राहणार नाही, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांनी सांगितले.
फोटो ओळ...
आरटीओ कार्यालात शिकाऊ परवाना विभागासमोर अशाप्रकारे उमेदवारांची गर्दी झाली होती.