१०८ रुग्णांना सुटी, ८० नव्या रुग्णांची वाढ

By | Published: December 6, 2020 04:02 AM2020-12-06T04:02:33+5:302020-12-06T04:02:33+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या ८० नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या १०८ रुग्णांना सुटी देण्यात ...

Leave for 108 patients, increase of 80 new patients | १०८ रुग्णांना सुटी, ८० नव्या रुग्णांची वाढ

१०८ रुग्णांना सुटी, ८० नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या ८० नव्या रुग्णांची वाढ झाली आणि उपचार पूर्ण झालेल्या १०८ रुग्णांना सुटी देण्यात आली, तर जिल्ह्यातील ३ आणि मध्य प्रदेशातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३,८४० एवढी झाली आहे. यातील ४१,७८८ रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत, तर १,१५७ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ८९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ८० रुग्णांत मनपा हद्दीतील ६८, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ८७ आणि ग्रामीण भागातील २१ अशा १०८ रुग्णांना शनिवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना शहानूरवाडी येथील ७१ वर्षीय पुरुष, पैठण तालुक्यातील बालानगरमधील ८४ वर्षीय पुरुष, पहाडसिंगपुरा येथील ५६ वर्षीय स्त्री आणि मध्य प्रदेशातील ४६ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

फकीरवाडी १, शिवाजीनगर , गारखेडा १, एन - १३ वानखेडे १, एन-९, श्रीकृष्णनगर १, हर्सूल १, चिकलठाणा १, मयूर पार्क २, नारळीबाग १, राधेशाम कॉम्पलेक्स, नारळीबाग ३, म्हाडा कॉलनी ३, मल्हार चौक १, गजानननगर १, छत्रपतीनगर १, आदिनाथ सुवास्तू बीड बायपास १, मिलेनियम पार्क हौसिंग सोसायटी १, एन-२ सिडको १, सातारा परिसर १, छत्रपतीनगर, गारखेडा १, मंदीपनगर, आकाशवाणी १, झेडपी कॉटर्स १, विश्रांतीनगर १, सातारा परिसर १, घाटी परिसर २, होनाजीनगर १, हर्सूल, पिसादेवी रोड १, विनायक कॉलनी, एन-दोन, सिडको १, मिलिंदनगर, उस्मानपुरा १, एन-चार सिडको १, समर्थनगर १, काल्डा कॉर्नर १, बजरंग चौक, श्री कॉलनी १, एन- दोन रामनगर १, टिळकनगर १, अन्य २९.

ग्रामीण भागातील रुग्ण

पंढरपूर नाका १, सारा इलाईट सिडको, महानगर-१, तीसगाव १, काथापूर, पैठण १, अन्य ९.

Web Title: Leave for 108 patients, increase of 80 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.