‘फ्युचर मंत्रा’ करिअरविषयक चिंता आता सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:23 AM2017-11-10T00:23:23+5:302017-11-10T00:23:26+5:30

१ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी पडणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी ‘लोकमत’ आणि व्हीआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ‘फ्युचर मंत्रा’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

 Leave the worry of 'Future Mantra' career now | ‘फ्युचर मंत्रा’ करिअरविषयक चिंता आता सोडा

‘फ्युचर मंत्रा’ करिअरविषयक चिंता आता सोडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बारावीनंतर नेमके काय करावे, हा प्रश्न अनेकांना विचारात टाकणारा आहे. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आजकालच्या सुज्ञ पालकांनादेखील याबाबत खूप विचार करावा लागतो. आज केवळ डॉक्टर, इंजिनिअर एवढ्यापुरतेच करिअर मर्यादित राहिले नसून विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक नव्या वाटा खुणावू लागल्या आहेत. ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी पडणा-या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल उंचविण्यासाठी ‘लोकमत’ आणि व्हीआयटी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी ‘फ्युचर मंत्रा’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
सन्मित्र कॉलनी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, म.सा.प. रॉक्सी सिनेमागृहाजवळ येथे सायं. ५ वा. हा कार्यक्रम होईल. १२ वी नंतर नेमके काय करावे, कोणत्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करावे, योग्य इन्स्टिट्यूट कसे निवडावे, अ‍ॅडमिशनची पद्धती कशी असेल, त्यासाठी आवश्यक तयारी, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘फ्युचर मंत्रा’ या कार्यक्रमातून मिळतील.
वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याची युवकांची इच्छाशक्ती असते. या इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर यश आपल्याच मुठीत आहे. विद्यार्थ्यांनो कोणतेही मोठे यश मिळविण्यासाठी योग्य वेळी मिळणारी प्रेरणाही तितकीच महत्त्वाची ठरते. या कार्यक्रमात तुम्हाला तज्ज्ञ मंडळींकडून प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधीही मिळणार आहे.

Web Title:  Leave the worry of 'Future Mantra' career now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.