एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

By Admin | Published: May 20, 2017 12:49 AM2017-05-20T00:49:35+5:302017-05-20T00:50:06+5:30

जालना :कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे.

LED street lights offer ...! | एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव बारगळला...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहर अंधारमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून एनर्जी इफिशियंसी सर्व्हिसेस लिमीटेड कंपनीमार्फत एलईडी पथदिवे बसविण्याचे नियोजन केले. लोकप्रतिनिधींचा हस्ते या कामाचे अधिकृत उदघाटनही झाले. मात्र, कंपनीच्या करारातील अटी, वीज बिलाची थकबाकी भरण्याबाबत उदासीन असलेली पालिका या कारणांमुळे एलईडी पथदिव्यांचा प्रस्ताव अखेर बारगळा आहे.
महावितरणचे चौदा कोटींचे वीज बिल थकल्यामुळे शहरातील पथदिवे अनेक वर्षांपासून बंद आहेत. अभय योजनेचा लाभ घेत पालिकेने तीन टप्प्यांत पाच कोटींचे वीजबिल भरले असले तरी पालिकेकडे अद्याप दहा कोटींची थकबाकी आहे. असे असताना शहरातील बंद पथदिवे पुन्हा सुरू करणे व वीज बिलात बचत करण्यासाठी पालिकेने एनर्जी
इफिशियंसी सर्व्हिसेस दिल्ली या कंपनीमार्फत शहरात नवीन तेरा हजार एलईडी दिवे बसविण्याचे नियोजन केले. सप्टेंबर २०१६ मध्ये पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत मामा चौकातून एलईडी दिवे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली. मात्र, तीनशे पथदिवे बसविल्यानंतर कंपनीने पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर करारनामा ठेवला. करारनाम्यात एलईडी दिवे बसविल्यानंतर वीज बिलात होणारी बचत इइएसएल कंपनीला अनामत म्हणून देण्यात यावी. एलईडी दिव्यांची सात वर्षे देखभाल दुरुस्तीच्या खर्चासह अन्य अटींचा समावेश आहे. इइएसएल कंपनीच्या या अटींना नगरपालिकेने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे कंपनीने शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम थांबविले. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य कायम आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: LED street lights offer ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.