विधानपरिषद निवडणूक : १७५ पोस्टल मते ठरली बाद ; विजयाचा कोटा ठरणे अद्याप बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:38 PM2020-12-03T16:38:26+5:302020-12-03T16:40:45+5:30

Vidhan Parishad Election, Marathwada : मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. चिकलठाणा येथे सकाळी ८ वा. मतमोजणीस सुरुवात

Legislative Assembly elections: 175 postal votes rejected; There is still a long way to go | विधानपरिषद निवडणूक : १७५ पोस्टल मते ठरली बाद ; विजयाचा कोटा ठरणे अद्याप बाकी

विधानपरिषद निवडणूक : १७५ पोस्टल मते ठरली बाद ; विजयाचा कोटा ठरणे अद्याप बाकी

googlenewsNext
ठळक मुद्देवैध मतांच्या बेरजेनंतर ठरणार विजयाचा कोटामतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार मोजणीसाठी दोन हॉलमध्ये ५६ टेबल कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीसाठी मतमोजणी

औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर आता मतमोजणीची उत्सुकता लागलेली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली असून सध्या पोस्टल मतांची मोजणी सुरु आहे. पोस्टलच्या एकूण १२४८ पैकी १७५ मते बाद झाली आहेत. १०७३ मतांची मोजणी सुरू आहे. महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा प्रचार या निवडणुकीत झाल्यामुळे मतदारांनी कोणत्या समीकरणांचा स्वीकार केला आहे, हे निकालावरून स्पष्ट होणार आहे. 

विजयाचा कोटा अद्याप निश्चित झाला नाही. ५६ टेबलवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येईल. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येतील. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास सुरुवात होईल. येथूनच खरी मतमोजणी सुरू होईल. या सगळ्या प्रक्रियेला रात्री ८ वाजेपर्यंत वेळ लागेल. तोपर्यंत वैध मतांचा कोटा आणि विजयासाठी लागणाऱ्या एकूण मतदानाचा आकडा समोर येईल. 

कोटा पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या पसंतीसाठी मोजणी
विजयी मतांचा कोटा पहिल्या फेरीत पूर्ण झाला नाहीतर दुसऱ्या पसंतीची मतमोजणी (नेक्स्ट अव्हेलेबल प्रीफे्रंस) सुरू करण्यात येईल. यात ३३ उमेदवारांचे ईलीमेनेशन सुरू होईल. दोन उमेदवारांपैकी ज्याचा कोटा पूर्ण होईल. तो विजयी होईल. समान मते मिळाल्यास टॉस करून निर्णय घेतला जाईल. १ हजार मतपत्रिकांमागे  १ सुपरवायझर, ३ सहायक कर्मचारी असतील. पहिली पसंती आणि थेट तिसरी पसंती दिलेली असेल तर सदरील मतपत्रिका एक्झहॉस्टेड ठरविण्यात येईल. 
 

Web Title: Legislative Assembly elections: 175 postal votes rejected; There is still a long way to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.