कर्जाच्या आमिषाने गंडा

By Admin | Published: August 11, 2015 12:50 AM2015-08-11T00:50:58+5:302015-08-11T01:00:14+5:30

औरंगाबाद : पाच रुपये प्रतिशेकडा दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालून भामटा फरार झाल्याचे

Lending to the borrower of the loan | कर्जाच्या आमिषाने गंडा

कर्जाच्या आमिषाने गंडा

googlenewsNext


औरंगाबाद : पाच रुपये प्रतिशेकडा दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालून भामटा फरार झाल्याचे १० आॅगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच २५ ते ३० जणांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यानंतर आयुक्तांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले.
सौरभ गुप्ता, नवराज सिंग आणि दिव्या कांबळे ही नावे सांगून आरोपींनी सिडको बसस्थानकाजवळील अक्षयदीप प्लाझामधील पहिल्या माळ्यावरील गाळा नंबर २२० दोन महिन्यांपूर्वी भाड्याने घेतला. तेथे त्यांनी श्री शिवशक्ती इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड के्र डिटस् सर्व्हिसेस नावाचे कार्यालय सुरू केले. या कार्यालयात अत्यल्प दरात गरजूंना कर्ज उपलब्ध केले जात असल्याची त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली. या कार्यालयात काम करण्यासाठी त्यांनी दोन मुली आणि दोन तरुणांना प्रत्येकी ८ ते १० हजार रुपये महिन्याने नोकरीस ठेवले. वर्तमानपत्रात आलेली जाहिरात वाचून गरजू लोक या कार्यालयात जाऊन कर्ज मिळण्यासाठी काय करावे लागते, याबाबतची माहिती घेत. त्यावेळी दिव्या कांबळे नावाची तरुणी कर्ज प्रक्रिया समजून सांगे. कर्ज प्रस्ताव दाखल करणाऱ्या व्यक्तीला खाजगी नोकरी करणारे दोन जामीनदार अथवा सरकारी नोकर असलेली एक व्यक्ती जामीनदार म्हणून देणे बंधनकारक होते. त्यानुसार दोनशे ते तीनशे नागरिकांनी या कंपनीकडे कर्ज प्रस्ताव दाखल केले. कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्या सर्वांना तुमची फाईल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आलेली आहे, असे सांगितले.
१० आॅगस्ट रोजी बोलावले
सर्व प्रस्तावकांना त्यांनी १० आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार्यालयात येण्याचे सांगितले. त्यामुळे शंभर ते दीडशे लोक सकाळीच तेथे पोहोचले. मात्र कार्यालयात नेहमीसारखी रेलचेल दिसली ना कर्ज देण्याचे आमिष दाखविणारे. कार्यालय उघडे होते. आरोपी आदल्या दिवशीच पसार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १
फाईल मंजूर करण्यासाठी ते कर्ज प्रस्ताव खर्च म्हणून प्रस्तावित कर्जाच्या दोन टक्के रक्कम आणि सर्व्हिस टॅक्स घेत असत. लाडसावंगी (ता.औरंगाबाद) येथील शेतकरी रखमाजी शिंदे यांना सहा लाखांचे कर्ज मंजूर केल्याचे सांगून त्यांच्याकडून १५ हजार ६८० रुपये त्यांनी घेतले, तर १२ लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून प्रभाकर पवार यांच्याकडून ३२ हजार रुपये घेतले. भीमराव शिंदे यांना दीड लाखाचे आमिष दाखवून ८ हजार ८४० रुपये घेतले.२
मुकुंदवाडी येथील निगुणाबाई अप्पाराव मोरे यांची आकणी (ता. मंठा, जि.जालना) येथे शेती आहे. शेतीविकासासाठी त्यांनी कर्जाची मागणी केली. त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे घेतल्यानंतर त्यांनी ८ लाख रुपये कर्ज मंजूर केले. या कर्जासाठी त्यांनी मोरे यांच्याकडून ७० हजार रुपये घेतले आणि दहा आॅगस्ट रोजी सकाळी कर्र्जाचा धनादेश घेण्यासाठी येण्याचे त्यांना सांगण्यात आले.
संशय येऊ नये, यासाठी ते एखाद्या मोठ्या फायनान्स कंपनीसारखा कारभार करीत. त्यांची स्वत:ची वेबसाईटही त्यांनी सुरू केली.
४शिवाय कर्ज प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी त्यांनी दोन तरुण आणि दोन तरुणींची नियुक्ती केली.
४कर्ज प्रस्ताव दाखल करणाऱ्यास त्याच्या घरासमोर उभे करून मोबाईलमध्ये फोटो घेणे त्यांना बंधनकारक होते. दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना त्यांनी वेतनही दिले नाही.

Web Title: Lending to the borrower of the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.