बिबट्याचा दोन पिलांसह वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:47 PM2017-11-29T23:47:10+5:302017-11-29T23:47:14+5:30
बनोटी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढल्याने शेतकरी भयभीत झाले असून वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील रबी हंगाम थंडावला आहे. मंगळवारी मध्यरात्री घोरकुंड शिवारात दोन पिलांसह बिबट्या दिसल्याने शेतकरी, मजूर शेतीकामासाठी जात नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बनोटी : बनोटी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ वाढल्याने शेतकरी भयभीत झाले असून वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील रबी हंगाम थंडावला आहे. मंगळवारी मध्यरात्री घोरकुंड शिवारात दोन पिलांसह बिबट्या दिसल्याने शेतकरी, मजूर शेतीकामासाठी जात नसल्याचे चित्र आहे.
महिनाभरात बनोटी परिसरात बिबट्याने १७ जनावरे फस्त केली आहेत. यातील सर्व हल्ले बनोटी वनक्षेत्राची हद्द सोडून शेती शिवारातील गोंदेगाव, निंभोरा, उप्पलखेडा तलावाच्या जवळील आहे. बनोटी वनक्षेत्रातील कर्मचाºयांनी खबरदारीचा उपाय म्हणून निंभोरा शिवारात गेल्या चार दिवसांपासून कैलास पाटील यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. पिंजºयात बिबट्या आलाच नाही. उलट पिंजरा लावला त्या दिवसापासून बिबट्याने उप्पलखेडा येथे एक गाय, निंभोरा शिवारात दोन हरण, बनोटी शिवारात तीन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याने दहा किलोमीटर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुणीही शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याने रबी हंगामातील पेरा रखडला आहे.