आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात

By साहेबराव हिवराळे | Published: August 2, 2023 06:43 PM2023-08-02T18:43:00+5:302023-08-02T18:50:04+5:30

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, ते सर्व व्हिडीओ नाशिकच्या भवानीनगरातील असल्याचे निदर्शनास आले.

Leopards in Nashik, Rumors spread in Chhatrapati Sambhajinagar | आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात

आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरातील भवानीनगरात बिबट्या दिसल्याची अफवा सोशल मीडियावर व्हिडीओ टाकल्याने सोमवारी रात्रीपासून सुरू झाली, ती मंगळवारीही प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करीत होती, परंतु सोशल मीडियावर ‘सरकाव’ नीतीमुळे ‘आला व्हिडीओ की पाठव दुसऱ्याला’ अशीच सवय बळावली आहे. त्याचा मनस्ताप शहरातील नागरिकांना सहन करावा लागला. 

वनविभागाच्या परीक्षा सुरू असून, अधिकारी त्या कामात असतानाच त्यांचाही ताण वाढला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, ते सर्व व्हिडीओ नाशिकच्या भवानीनगरातील असल्याचे निदर्शनास आले. अफवांवर विश्वास ठेवू नये, विनाकारण अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.
 

Web Title: Leopards in Nashik, Rumors spread in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.