४ हजार शिक्षकांना दिले ‘प्रगत’चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:47 AM2017-10-01T00:47:25+5:302017-10-01T00:47:25+5:30

: तालुक्यातील तरोडा येथील देवीदास गुंजकर या अवलिया शिक्षकाने १६० कार्यशाळेद्वारे ४ हजारांच्यावर शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमाचे धडे दिले आहेत.

Lessons of 'Advanced' to 4 thousand teachers | ४ हजार शिक्षकांना दिले ‘प्रगत’चे धडे

४ हजार शिक्षकांना दिले ‘प्रगत’चे धडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील तरोडा येथील देवीदास गुंजकर या अवलिया शिक्षकाने १६० कार्यशाळेद्वारे ४ हजारांच्यावर शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमाचे धडे दिले आहेत.
तरोडा येथील शाळा द्विशिक्षकी आहे. येथे पहिली ते चौथी १०० टक्के प्रगत आहे. ज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वापर कृतीयुक्त अध्यापन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थी प्रगत करण्याचे ध्येय आदीमुळे तरोडा येथील सर्व विद्यार्थी प्रगत आहेत. या शाळेला हिंगोली जिल्ह्यासह यवतमाळ, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यातील शिक्षकांनी या शाळेला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान विद्यार्थी प्रगत कसे करायचे. याबाबत गुंजकर यांनी ४ हजारांच्या जवळपास शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
गुंजकर यांनी १६० कार्यशाळांतून शिक्षकांना प्रगतचे धडे दिले. उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही गुंजकर यांनी विद्यार्थ्यांची शाळा भरवत त्यांना अध्यापन केले. ज्ञानरचनावादाचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून गुंजकर यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मागील दोन वर्षांपासून तरोडा येथील शाळा १०० टक्के प्रगत आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी त्यांनी शिक्षण दिले. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना दृढ झाल्या आहेत. ही शाळा शैक्षणिक साहित्यांनी गजबजली आहे. सर्व विषयात विद्यार्थ्यांची आघाडी आहे. अनेक अधिकाºयांनी या शाळेला भेट दिली. गुणवत्ता पाहून सर्वांनीच गुंजकर यांचे कौतुक केले.
गुंजकर यांचे प्रगतबद्दलचे योगदान पाहता अनेक संस्था व जि.प.ने आदर्श शिक्षक हा पुरस्कार दिला. नुकताच राज्य पातळीवरील शिक्षकतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी तरोडा शाळेला भेट दिली. त्यांनी या शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी अभिप्रायात लिहिले की, विद्यार्थ्यांना प्रगत करणारा, आत्मविश्वास जागवणारा, स्वयंप्रेरणेने काम करणाºया शिक्षकाला माझा सलाम.

Web Title: Lessons of 'Advanced' to 4 thousand teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.