ऐन परीक्षेच्या तोंडावर मुलींना स्वरक्षणाचे धडे
By Admin | Published: March 20, 2016 11:18 PM2016-03-20T23:18:55+5:302016-03-20T23:23:56+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील माध्यमिकच्या ३३ शाळांमध्ये मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले.
हिंगोली : जिल्ह्यातील माध्यमिकच्या ३३ शाळांमध्ये मुलींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले. मात्र त्याची शिक्षण विभागालाही खबर नसल्याने हा कार्यक्रम १७ मार्चपासून सुरू झाला आहे.
राष्ट्रीय माध्यमिक सर्व शिक्षा अभियानात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रतीशाळा ९ हजारांचे अनुदान शासनाने परस्पर त्यांच्या खात्यावर जमा केल्याचे जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले. याशिवाय यासाठी निवडलेले प्रशिक्षक हे क्रीडा विभागाने दिलेल्या यादीतून निवडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र ऐन परीक्षा, सुट्यांच्या तोंडावर हा दहा दिवसांचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यात तो खऱ्या अर्थाने किती दिवस होईल, याचा नेम नाही. निदान शिक्षण विभागाने तरी तो पुढे ढकलणे अपेक्षित होते. (जिल्हा प्रतिनिधी)