रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:02 AM2019-01-24T00:02:29+5:302019-01-24T00:03:01+5:30

खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे.

 Lessons of farmers to Rabi Crop Insurance | रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

रबी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

googlenewsNext

रऊफ शेख
फुलंब्री : खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा काढण्यासाठी एकीकडे शेतकºयांनी बँका, तसेच सेतू केंद्रांसमोर दिवसरात्र तळ ठोकला होता. मात्र, फुलंब्री तालुक्यातील शेतकºयांनी यंदा रबी हंगामातील पीक विमा काढण्यासाठी उदासीनता दाखविली आहे. येथील २२ हजार शेतकºयांपैकी केवळ १,७५० शेतकºयांनी रबी पिकांसाठी विमा काढला असून, याला कारणीभूत यावर्षीचा दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बळीराजाने विमा काढण्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसानही त्यांचेच होणार आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केल आहे.
तालुक्यात रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजारांवर आहे. यावर्षी विविध कारणांमुळे खरीप व रबी पिके धोक्यात आली व त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले. काही वेळा पिकांची नासाडी झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसला. मात्र, तरीही यावर्षी रबी पिकांच्या विम्याकडे बहुतांश शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे पीक विमा भरण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही. मात्र, पिकांचे नुकसान झाले, तर मदतीसाठी शासनाकडे मोठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शेतकºयांनी विमा न काढणेच पसंत केले.
जाणकारांच्या मते तालुक्यात गत काही वर्षांपासून पर्जन्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत येथील शेतकºयांनी गतवर्षी काही प्रमाणात पीकविमा काढला होता; पण त्यातून पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. याच कारणामुळे त्यांनी विम्याकडे दुर्लक्ष केले. विशेष बाब म्हणजे विमा काढावा यासाठी शासनाने कृषी विभागाकडे जनजागृती करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी गावोगावी जाऊन पीक विमा संरक्षणाबाबत माहिती दिली. मात्र, त्याचा काहीही फायदा झालेला दिसून येत नाही. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नाही, बँकेत चकरा माराव्या लागतात, ठरवून देलेली रक्कम मिळत नाही. त्यामुळे विमा न काढणेच पसंत केल्याचे येथील बहुतांश शेतकºयांनी सांगितले.
दरम्यान, तालुक्यात रबी पिकाचे क्षेत्र २९ हजार हेक्टर असून, यातील केवळ ८८९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला. त्यापैकी रबी पिके घेणाºया शेतकºयांची संख्या २२ हजार एवढी आहे. मात्र, २२ हजार शेतकºयांपैकी अवघ्या १,७५० शेतकºयांनी विमा काढला आहे, तर २० हजार शेतकºयांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली असून, ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला नाही, असे शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात, हे लक्षात असूनही याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.
पीक विमा भरण्यासाठी शेतकºयाला एकूण रकमेच्या केवळ पाच टक्केच रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून भरतात. त्यामुळे शेतकºयांवर फारसे ओझे पडत नाही. मात्र, असे असतानाही शेतकरी या योजनेकडे दुर्लक्ष करतात. तालुक्यातील शेतकºयांनी रबी हंगाम २०१५-२०१६ मध्ये गहू व हरभºयासाठी विमा काढला होता. मात्र, नुकसान झालेले असताना त्यांना शेतकºयांच्या बियाणांचा खर्चही निघाला नाही. याच परिस्थितीचा अनुभव शेतकºयांना २०१६-२०१७ मध्ये आला होता. त्यामुळे दरवर्षी विमा काढणाºया शेतकºयांची संख्या घटताना दिसत आहे.

Web Title:  Lessons of farmers to Rabi Crop Insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.