उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांना कलेसह संरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 08:33 PM2019-05-09T20:33:19+5:302019-05-09T20:33:39+5:30

जानकीदेवी बजाज सेवा केंद्रातर्फे आयोजित उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कलेसह संरक्षणाचे धडे दिले जात आहेत.

Lessons to protect students from the summer camp | उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांना कलेसह संरक्षणाचे धडे

उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांना कलेसह संरक्षणाचे धडे

googlenewsNext

वाळूज महानगर : जानकीदेवी बजाज सेवा केंद्रातर्फे आयोजित उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कलेसह संरक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यामुळे शिबीराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


पंढरपुरातील बजाज विहार येथे जानकीदेवी बजाज सेवा केंद्राच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबीरात दिलीप यार्दी, सुरेंद्र झिरपे, भाग्यश्री लाटकर, विना तालीकोटकर, मनिषा कोकीळ, डॉ. रश्मी बोरीकर, विना वायदंडे, ऋषीकेष कविमंडन, दिलीप खंडेराय, सारंग टाकळकर आदी मंडळी हस्तकला, विविध खेळ, लोकनृत्य, हस्ताक्षर, पर्यावरण विषयक माहिती, भाषण कौशल्य आदी कलेबरोबरच संरक्षणाचे धडे देत आहेत. एकाच छताखाली सर्व सुविधा मिळत असल्याने या शिबीराला परिसरातील शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासाठी सुनिता तगारे, सुवर्णा इंगळे ऐश्वर्या मोहिते आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Lessons to protect students from the summer camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.