Uddhav Thackerey: "तुझ्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस येऊ दे"; औरंगाबादेतही झळकले बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:55 PM2022-06-24T12:55:37+5:302022-06-24T13:01:29+5:30

महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले

"Let Devendra Fadnavis come to your puja as the Chief Minister"; Banners flashed in Aurangabad too | Uddhav Thackerey: "तुझ्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस येऊ दे"; औरंगाबादेतही झळकले बॅनर

Uddhav Thackerey: "तुझ्या पुजेला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस येऊ दे"; औरंगाबादेतही झळकले बॅनर

googlenewsNext

औरंगाबाद/मुंबई - शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलावलेल्या वर्षा बंगल्यावरील बैठकीत केवळ १८ शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. त्यातच, आता शिंदे गटाला भाजपकडून पाठबळ मिळत असून सत्तास्थापनेचं गणितही ठरल्याचं समजतंय. त्याच पार्श्वभूमी देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री म्हणून समर्थन केलं जात आहे. यंदाच्या आषाढी एकादशीला फडणवीसांनाच मान मिळू दे, अशा पोस्ट, डिजिटल फलक दिसून येतात.  

महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले असून लवकरच राज्यामध्ये भाजपची सत्ता येईल आणि येत्या आषाढीच्या विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस करतील असे भाकीत सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी यापूर्वी केले होते. आता, औरंगाबादेतही याच आशयाचा डिजिटल फलक झळकला आहे. एकीकडे 2 वर्षानंतर पंढरीची वारी घडत असल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष तिकडे लागले आहे. तर, दुसरीकडे राजकीय रिंगण रंगल्याने महाराष्ट्रात सत्ताबदलाचे ढग जमा झाल्याचं दिसून येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात वरूड येथील भाजपचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर दांडगे यांनी लावलेला डिजिटल फलक लक्ष वेधत आहे. यंदाच्या आषाढी एकादशीस पंढरपुरातील पांडुरंगाची पुजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते घडवून आणण्यासाठी आशीर्वाद देण्याचं साकडे दांडगे यांनी डिजिटल फलकातून घातलं आहे. जालना महामार्गावरील केब्रिज चौकात लावण्यात आले आहे. हे पोस्टर सर्व वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या या पोस्टरची चर्चा असून हा बॅनर सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. 

'उद्धव साहेब माफ करतील'

संतोष बांगर हे मुंबईहून शुक्रवारी सकाळी हिंगोलीत परतले. येथे त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. यावेळी बंडखोर आमदारांना परतीचे आवाहन करताना त्यांना रडू कोसळले. "तुम्ही काही दिवसापासून बघत आहात, वातावरण अतिशय वाईट आहे. त्या सर्व आमदारांना माझी कळकळीची विनंती आहे. ज्यांनी-ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली, त्यांच्यावर पुन्हा गुलाल उधळला नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की, तुम्ही उद्धव ठाकरेंकडे या. साहेब शंभर टक्के तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाहीत."

"आमदारांना शिवसैनिकांचा इशारा"

शिंदे यांना गटनेटे पदावरून हटवलं असून त्यांच्याजागी शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. दुसरीकडे वर्षावरील बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेना भवनावर जमण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता हळूहळू शिवसैनिकांची गर्दी जमायला सुरूवात झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिक म्हणाले की, गद्दारांना शिवसेनेत माफी नाही. ते मुंबईत कसं पाऊल ठेवताय हे बघूच. विधानभवनात त्यांना यायवच लागेल असं शिवसैनिक म्हणाले त्याचसोबत उद्धवसाहेबांनी आदेश द्यावे या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.  
 

Web Title: "Let Devendra Fadnavis come to your puja as the Chief Minister"; Banners flashed in Aurangabad too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.