लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 05:45 PM2017-12-27T17:45:15+5:302017-12-27T17:45:37+5:30

इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो.

Leva Patidar community wants government help! | लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

लेवा पाटीदार समाजाला हवी उद्योगधंद्यासाठी सरकारची मदत !

googlenewsNext

औरंगाबाद : इ.स. बाराशेमध्ये गुजरातेतून स्थलांतरित होऊन विशेषत: जळगाव व बुलढाणा जिल्ह्यात स्थायिक झालेला लेवा पाटीदार समाज आता औरंगाबादेतही बर्‍यापैकी दिसू लागला आहे. या समाजाची सुमारे साडेपाच हजार कुटुंबे म्हणजे जवळपास २५ हजार लोकसंख्या औरंगाबादेत  असून, हा समाज उद्योगधंद्यात  स्थिरावू इच्छितो. नोकर्‍यांमध्येही आहे. पण या समाजाच्या तरुणांना, व नोकर्‍यांमधून बाहेर पडून उद्योगधंदे करू इच्छिणार्‍यांसाठी शासकीय मदत मिळावी, त्यांना एमआयडीसीत प्राधान्याने भूखंड उपलब्ध व्हावेत, योग्य कर्जपुरवठा व्हावा अशी अपेक्षा लोकमतच्या बिरादरीत व्यक्त करण्यात आली. 

विकास चौधरी, व्ही.आर. महाजन, मधुकर सरोदे, ओमप्रकाश चौधरी आणि सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक जगन्नाथ किनगे आदींनी बिरादरीच्या या चर्चेत लेवा पाटीदार समाजाच्या समस्यांना वाचा फोडली.लेवा पाटीदार मित्र मंडळ व लेवा पाटीदार प्रोफेशनल असोसिएशनचे  हे सारे जण प्रमुख. गुजरातमध्ये आमचा समाज खुल्या प्रवर्गात आहे. पण महाराष्ट्रात ओबीसीमध्ये आहे, याचे  समाधान त्यांनी व्यक्त केला. लेवा पाटीदार हा मूळचा शेतकरी समाज. जळगाव जिल्ह्यात केळीचे उत्पादन घेणारा. पण अलिकडे पाण्याचीपातळी खाली खाली जात असल्याने केळीच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. औरंगाबादेत स्थायिक झालेल्या समाजासाठी सामाजिक सभागृह वा मंगल कार्यालय हवे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह हवे. यासाठी सरकारने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी विकास चौधरी व सर्वांनी केली. 

माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी, एकनाथ खडसे, खा. रक्षा चौधरी, आ. राजू भोळे, आ. हरिभाऊ जावळे, प्रख्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी, साहित्यिक भालचंद्र नेमाडे अशी नामवंत मंडळी लेवा पाटीदार समाजातून येतात, याबद्दलचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

मुला- मुलींचे विषम प्रमाण ही मोठी समस्या...
अन्य समाजाप्रमाणेच लेवा पाटीदार समाजही आज मुला- मुलींच्या विषम प्रमाणास सामोरे जात आहे. जळगाव  व बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी कुटुंबातील मुलांना आज  मुली मिळत नाहीत म्हणून ते विवाह करु शकत नाहीत. मुलांपेक्षा मुली खूप शिकलेल्या आहेत. पण एक हजार मुलांमागे आठशे मुली असे प्रमाण आहे. गावाकडे ५० एकर शेती आहे, पण त्या मुलाला मुलगी मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच मुला- मुलींचे जमत नाही म्हणून घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे.यासंदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून औरंगाबादेत लवकरच एक शिबीर घेण्यात येणार आहे. त्याआधी २४ डिसेंबर रोजी नाशिक येथे असे शिबीर होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

Web Title: Leva Patidar community wants government help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.