भूमिपूजनासाठी आठवडाभरात होणार सपाटीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:02 AM2021-07-05T04:02:01+5:302021-07-05T04:02:01+5:30

औरंगाबाद : दूध डेअरी येथील नियोजित २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी जुने बांधकाम पाडण्याच्या कामाला वेग ...

The leveling will be completed within a week for Bhumi Pujan | भूमिपूजनासाठी आठवडाभरात होणार सपाटीकरण पूर्ण

भूमिपूजनासाठी आठवडाभरात होणार सपाटीकरण पूर्ण

googlenewsNext

औरंगाबाद : दूध डेअरी येथील नियोजित २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी जुने बांधकाम पाडण्याच्या कामाला वेग आला आहे. आठवडाभरात जागेचे सपाटीकरण पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर भूमिपूजन होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

शहरात तब्बल सात वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी दूध डेअरी येथील जागेतील जुने बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु हे काम संथगतीने सुरू होते. याविषयी ‘लोकमत’ने २ जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दूध डेअरी येथील जागेत सुरू असलेल्या पाडकामाची पाहणी करून आढावा घेतला. या जागेत मोठमोठ्या मशीन होत्या. तसेच जुने बांधकामात लोखंडी भाग होते. त्यासाठी गॅस वेल्डिंगची मदत घेतली जात होती. परंतु या कामासाठी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नव्हते. त्यामुळे काम संथगतीने सुरू होते. परंतु आता ऑक्सिजनची उपलब्धता झाल्याने ८ तारखेपर्यंत सपाटीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.

------

फोटो ओळ

१) दूध डेअरी येथील महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या जागेतील जुन्या इमारती पाडण्याच्या कामाची पाहणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एस.व्ही. कुलकर्णी.

Web Title: The leveling will be completed within a week for Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.