आयटीआयमध्ये बंद ग्रंथालयाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 20:58 IST2018-10-26T20:58:02+5:302018-10-26T20:58:23+5:30
औरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ग्रंथालय अनेक वर्षांपासून बंद आहे. या ग्रंथालयातील पुस्ताकांचा विद्यार्थ्यांना कोणताही लाभ घेता ...

आयटीआयमध्ये बंद ग्रंथालयाचे पूजन
औरंगाबाद : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ग्रंथालय अनेक वर्षांपासून बंद आहे. या ग्रंथालयातील पुस्ताकांचा विद्यार्थ्यांना कोणताही लाभ घेता येत नाही. यामुळे युवा क्रांती एल्गारतर्फे या ग्रंथालयाचे पूजन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
मराठवाड्यातील सर्वांत मोठी आयटीआय प्रशिक्षण संस्था असलेल्या शासकीय आयटीआयमध्ये गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना महागडे पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. ग्रंथालयात ही सर्व पुस्तके उपलब्ध असताना त्यास टाळे ठोकण्यात आले आहे.
प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याविरोधात युवा क्रांती एल्गार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ग्रंथालयाचे पूजन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी देव राजाळे, सुशिल बोर्डे, विकास भालेराव, शुभम दहिवाल, आकाश बनकर, विशाल मोकळे आदी उपस्थित होते.