कन्नड तालुक्यातील तीन कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 07:56 PM2023-06-15T19:56:20+5:302023-06-15T19:57:04+5:30

तपासणीत त्रुटी आढळून आल्याने पथकाने केली कारवाई

Licenses of three agricultural service centers in Kannada taluk suspended | कन्नड तालुक्यातील तीन कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित

कन्नड तालुक्यातील तीन कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित

googlenewsNext

कन्नड - मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्याने तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने तालुक्यातील तीन कृषीसेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तंत्र अधिकारी गुण नियंत्रण प्रशांत पवार, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी गणेश सरकलवाड, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक व पंचायत समिती कृषी अधिकारी दिनकर जाधव यांनी या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद प्रकाश देशमुख यांनी ही कारवाई केली.

यांचे परवाने केले रद्द 
किसान ऍग्रो एजन्सी देवगाव रंगारी यांचा बियाणे विक्री परवाना, यश ऍग्रो कृषी सेवा केंद्र चापानेर  व न्यू पवन कृषी सेवा केंद्र चापानेर यांचे खत विक्री  परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Web Title: Licenses of three agricultural service centers in Kannada taluk suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.