शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:22 PM2019-01-09T12:22:26+5:302019-01-09T12:23:35+5:30

‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

life imprisonment in farmer's murder | शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्याला कारावास

googlenewsNext

औरंगाबाद : शेतीच्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून भाऊसाहेब साबळे यांचा खून करणारा कैलास फुलसिंग काकरवाल याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांनी ‘मरणास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली’ पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

३० सप्टेंबर २०१२ रोजी फुलंब्री तालुक्यातील एकघर पाडळी शिवारात भाऊसाहेब साबळे जनावरे चारत होता. त्यावेळी कोमलसिंग राजपूत हा ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीसाठी आला. भाऊसाहेबने विरोध केला असता कैलास फुलसिंग काकरवाल याने कुऱ्हाडीने भाऊसाहेबच्या डोक्यात वार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. मदतीसाठी दत्तू साबळे धावत आला असता फुलसिंग त्याला मारण्यासाठी गेल्यामुळे दत्तू पळत गावात गेला.

दरम्यान, कैलास फुलसिंग काकरवाल, बजरंग फुलसिंग काकरवाल, रामसिंग फुलसिंग काकरवाल, फुलसिंग मोहन काकरवाल हे घटनास्थळावरून गेले. त्यानंतर भाऊसाहेबला दत्तू साबळेने पिशोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २ ऑक्टोबर २०१२ रोजी भाऊसाहेब मरण पावला. वरील चौघांवर पिशोर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने कैलास काकरवाल याला दोषी ठरवत उपरोक्त शिक्षा सुनावली. उर्वरित तिघांना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्त करण्याचा आदेश दिला.

Web Title: life imprisonment in farmer's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.