वैजापूर पोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले दुर्मिळ गव्हाणी जातीच्या घुबडाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 07:26 PM2018-02-02T19:26:22+5:302018-02-02T19:27:54+5:30

झाडाच्या टोकावर पतंगाच्या मांज्याच्या तावडीत सापडलेल्या गव्हाणी घुबडास वैजापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले आहे. 

The life of the rare gavani breed of owl secured by Vaijapur polices efforts | वैजापूर पोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले दुर्मिळ गव्हाणी जातीच्या घुबडाचे प्राण

वैजापूर पोलिसांच्या दक्षतेमुळे वाचले दुर्मिळ गव्हाणी जातीच्या घुबडाचे प्राण

googlenewsNext

औरंगाबाद : झाडाच्या टोकावर पतंगाच्या मांज्याच्या तावडीत सापडलेल्या गव्हाणी घुबडास वैजापूर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले आहे. 

वैजापूर पोलिस स्टेशनच्या प्रांगणात दररोज़ प्रमाणे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेड़कर हे हज़री घेत होते. यावेळी  नांदेड़कर यांना पक्षाचा केविलवाणे ओरडण्याचा आवाज़ आला.त्या आवाजाचा शोध घेत असतांना त्यांना एक घुबडाचे पिल्लू हे पोलिस स्टेशन प्रांगणात असलेल्या उंच लिंबाच्या झाडावर पतंगाच्या मांज्याला अडकून असल्याचे त्यांना दिसून आले. हे पाहताच पोलिस काँस्टेबल गणेश जाधव यांनी त्या लिंबाच्या झाडावर चढून त्या घुबडास खाली आणले. यानंतर इतर कर्माचा-यांनी कात्रीच्या सहाय्याने पंखातील अडकलेला मांजा काढला व प्रथम उपचार करून वन रक्षक नंदू तगरे यांना सुपुर्द केले. यात पोलिस नाइक संजय घुगे,सचिन सोणार,मनोज कुलकर्णी, मोइज़ बेग,जालिंदर तमनार आदी कर्मचा-यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.

गव्हाणी घुबडाची माहिती -
गव्हाणी घुबड किंवा कोठीचे घुबड हे मुख्यत: बर्फाळ प्रदेशात राहणारा पक्षी आहे. ध्रुवीय आणि वाळवंटी प्रदेश, आशियातील हिमालयाच्या उत्तरेकडील भाग, इंडोनेशिया आणि पॅसिफिक महासागरातील काही बेटे सोडली तर संपूर्ण जगात हा पक्षी आढळतो. भारतात याच्या दोन मुख्य उपजाती आहेत. याला मराठीमध्ये घो घो पिंजरा, पांजरा, छोटे घुबड, कानेल, चहारा अशी अनेक नावे आहेत.

Web Title: The life of the rare gavani breed of owl secured by Vaijapur polices efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.