लातुरात अवकाळी पावसाचा फटका
By Admin | Published: January 2, 2015 12:42 AM2015-01-02T00:42:24+5:302015-01-02T00:45:56+5:30
लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरात गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या पावसामुळे हरभरा व तुरीच्या पिकांवर पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे़
लातूर : लातूर शहरासह जिल्हाभरात गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या पावसामुळे हरभरा व तुरीच्या पिकांवर पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे़या अवकाळी झालेल्या पावसामुळे गारपीट व अवर्षणात खंगलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा या तिहेरी फटक्याला सामोरे जावे लागत आहे़
लातूर जिल्ह्यात १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३२ टक्के क्षेत्रावर रबीची पेरणी झाली आहे़परंत, रबी हंगामातही योग्य ते पर्जन्यमान झाले नसल्याने आहे त्या क्षेत्रावर पेरणी करण्यात आली़ योग्यवेळी पाऊस झाला नाही़परंतु, गुरूवारी नवीन वर्षात पहाटे पाऊस झाला़ हा अवकाळी झालेला पाऊस असून यामुळे हरभऱ्यावर घाटीआळी व तुरीची फुलगळ व तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे़ सकाळी झालेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले़(प्रतिनिधी)
गुरूवारी पहाटे अवकाळी पाऊस झाला आहे़ या पावसात पाच दिवस सातत्य राहिले तर द्राक्षबागातील द्राक्षाच्या घडात पाणी जावून बागेवर डावणी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होवून जिल्ह्यातील आठशे एकरवरील द्राक्षबागा व डाळिंबाच्या उत्पादनात तीस टक्क्याची घट होवून फटका बसणार असल्याचे तळणी मोहगाव येथील तुकाराम येलाले या शेतकऱ्याने सांगितले़