दुसऱ्या दिवशीही हलक्या पावसाची हजेरी

By Admin | Published: November 22, 2015 11:28 PM2015-11-22T23:28:25+5:302015-11-22T23:43:10+5:30

राजेश खराडे, बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे.

Light rain showers in the next day | दुसऱ्या दिवशीही हलक्या पावसाची हजेरी

दुसऱ्या दिवशीही हलक्या पावसाची हजेरी

googlenewsNext


राजेश खराडे, बीड
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील तूर, कापसावर होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय रबीतील हरभरा, गव्हालाही धोका निर्माण झाला आहे.
कापसाच्या बोंड्याची वाढ खुंटली
अद्यापपर्यंत कापसाची एकच वेचणी झाली आहे. अधिकच्या उत्पादनाच्या हेतूने जवळपास ४ लाख हेक्टरावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. ढगाळ वातावरणामुळे शेंद्र बोंडाईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे फुलांचे बोंड्यातच रुंपातर होत नाही. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.
हरभऱ्याला घाटआळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेंगा पोखरल्या जात आहेत.
कांद्याचाही वांदा
कांद्याचे १० हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतानाही सुमारे १२ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. ढगाळ वातावरण व धुकीमुळे करप्याची लागण होत आहे. त्यामुळे कांद्याचाही वांदा होण्याची शक्यता आहे.
थंडीला सुरूवात होताच जिल्ह्यात गारपिटीचा धोका निर्माण झाला आहे. आष्टी, गेवराई, पाटोदा या तालुक्यात शनिवारी तुरळक पाऊसही झाला.
४रविवारी दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण असे चित्र पहावयास मिळाले. जिल्ह्यातील गढी, कोळगाव, चौसाळा, दादेगाव, केतुरा आदी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
४हलक्या सरींमुळे वातावरणात बदल झाला आहे. ऐन थंडीत पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Light rain showers in the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.