लिंबगावात सख्ख्या भावांचा तलावात बुडून करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:52 AM2017-12-20T00:52:39+5:302017-12-20T00:53:24+5:30

पाचोडजवळील लिंबगाव शिवारात असलेल्या पाझर तलावात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.१९) सायंकाळी घडली. या घटनेमुळे कुटुंबियांसह अख्ख्या गावावर शोककळा पसरली.

 In Limbagh, some brothers will be drowned in the lake and the ending ends | लिंबगावात सख्ख्या भावांचा तलावात बुडून करुण अंत

लिंबगावात सख्ख्या भावांचा तलावात बुडून करुण अंत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड : पाचोडजवळील लिंबगाव शिवारात असलेल्या पाझर तलावात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.१९) सायंकाळी घडली. या घटनेमुळे कुटुंबियांसह अख्ख्या गावावर शोककळा पसरली.
विशाल दत्ता घोडके (११), रितेश दत्ता घोडके (७) अशी दुर्दैवी अंत झालेल्या सख्ख्या भावंडांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, लिंबगावात दत्ता घोडके आपल्या शेतात वास्तव्यास आहेत. त्यांची दोन मुले विशाल हा चौथ्या वर्गात, तर रितेश दुसºया वर्गात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत होते. दोघेही शेतातून पायी शाळेत ये-जा करीत होते.
मंगळवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ते शाळेतून घरी निघाले; मात्र सायंकाळ झाली तरी ते घरी परतलेच नाहीत, त्यामुळे दत्ता घोडके यांना नातेवाईकांनी मुले का आली नाहीत, असे विचारले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जवळच असलेल्या तलावावर पाहणी केली असता मुलांच्या चपला दिसून आल्या. मुले तलावात पडल्याची शंका आल्यामुळे कुटुंबियांनी आरडाओरड केली. यामुळे ग्रामस्थ जमा झाले. गावातील अवधूत निर्मळ, सुनील घोडके, अनिल घोडके, ऋषिकेश सुरासे यांनी तलावात शोध घेतला असता दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. यावेळी पाचोड पोलीसही घटनास्थळी दखल झाले. दोन्ही मुलांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पाचोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तपास सपोनि. महेश आंधळे करीत आहेत.

Web Title:  In Limbagh, some brothers will be drowned in the lake and the ending ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.