लिंगायत महामोर्चाची औरंगाबादेत जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:53 PM2018-03-21T23:53:38+5:302018-03-21T23:59:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ...

Lingayat Mahamchare's Aurangabad sea preparation | लिंगायत महामोर्चाची औरंगाबादेत जय्यत तयारी

लिंगायत महामोर्चाची औरंगाबादेत जय्यत तयारी

googlenewsNext
ठळक मुद्देगावागावांत बैठका : स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी ८ एप्रिलला विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाची अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीकडून जय्यत तयारी सुरू असून, मराठवाड्यातील गावागावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत.
कर्नाटक सरकारने दोन दिवसांपूर्वीच लिंगायत समाजास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी मान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रातही या मागणीने आता अधिक जोर धरायला सुरुवात केली आहे. राज्यात आतापर्यंत नांदेड, लातूर, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ याठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत.
आता औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौकातून सुरू होणाऱ्या महामोर्चात महिला पारंपरिक फेटे परिधान करून सर्वात पुढे राहतील. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील व्यासपीठावर धर्मगुरू उपस्थित राहतील.
मराठवाड्यातील कानाकोपºयातून समाजबांधव येणार असल्याने शहरातील विविध मंगल कार्यालयांमध्ये त्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
झेंडे, पत्रके, पोस्टर्स झळकणार
महामोर्चाच्या तयारीसाठी ४ फेब्रुवारी रोजी पहिली बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर लिंगायत धर्म महामोर्चा विभागीय प्रचार कार्यालयाचे उद््घाटन क रण्यात आले.
गेल्या महिनाभरात बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथील गावागावांमध्ये ३५० वर बैठका घेण्यात आल्या. यापुढे लातूर, उस्मानाबादमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत.
लिंगायत मेडिकल असोसिएशनतर्फे झेंडे, लिंगायत बुक डेपो असोसिएशनतर्फे पत्रके, पोस्टर्स, स्टीकर्स, वकिलांतर्फे स्टेज, ध्वनिव्यवस्थेसाठी पुढाकार घेण्यात आल्याचे लिंगायत समन्वय समितीचे जिल्हा समन्वयक प्रदीप बुरांडे यांनी सांगितले.

Web Title: Lingayat Mahamchare's Aurangabad sea preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.