लिंगायत धर्म मान्यतेशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:15 AM2018-04-09T00:15:38+5:302018-04-09T00:16:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लिंगायत धर्म मान्यता मिळाल्यास हिंदू धर्मातील संख्या कमी होईल, अशी भीती काहींना आहे. परंतु ...

Lingayat religion will not be fit without acceptance | लिंगायत धर्म मान्यतेशिवाय स्वस्थ बसणार नाही

लिंगायत धर्म मान्यतेशिवाय स्वस्थ बसणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज : महासभेत धर्मगुरूंचे आशीर्वचन; तळपत्या उन्हात क्रांतीचौकातून विभागीय आयुक्तालयावर महामोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लिंगायत धर्म मान्यता मिळाल्यास हिंदू धर्मातील संख्या कमी होईल, अशी भीती काहींना आहे. परंतु हिंदू हा धर्मच नाही. हिंदू ही संस्कृती आणि राष्ट्र आहे. लिंगायत हा या राष्ट्राचा मूळ मालक आहे. आमचा धर्म लिंगायत आहे. जोपर्यंत लिंगायत धर्माला मान्यता देणार नाही, तोपर्यंत केंद्र सरकारला झोप येऊ देणार नाही. लिंगायत धर्म मान्यतेला विरोध करणाऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून आम्ही पुढे जाऊ, धर्म मान्यता घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा प. पू. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी दिला.
लिंगायत धर्म महामोर्चानिमित्त रविवारी (दि.८) विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील मैदानावर आयोजित महासभेत आशीर्वचनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रथम महिला जगद््गुरू प. पू. डॉ. माते महादेवीजी, जगद््गुरू ज्ञानेश्वरी माताजी, प. पू. बसवजय मृत्युंजय महास्वामीजी, प. पू. चन्नबसवानंद महास्वामीजी यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले, भारत हा धर्मप्रधान देश आहे. याठिकाणी इतर धर्मांना मान्यता मिळते. परंतु जो धर्म प्रमुख आहे, त्यालाच मान्यता नाही. यासाठी केवळ शासनाला दोषी धरता येणार नाही, तर मान्यतेसाठी आवाज उठविला जात नाही, हेदेखील एक कारण आहे.
लिंगायत धर्माला मान्यता मिळविणे सोपे नाही. कोणकोण विरोध करीत आहे, याचा विचार केला पाहिजे. या विरोधकांना सम्यक उत्तर देण्याची गरज आहे. धर्म मान्यता घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केंद्र सरकारला दिला. बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांनी मार्गदर्शन केले. अविनाश भोसीकर, प्रदीप बुरांडे यांनी मनोगत व्यक्त केले.
लिंगायत धर्म मान्यतेसाठी निवेदन
लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक वर्गात समाविष्ट करावे, अशी मागणी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने निवेदनाद्वारे विभागीय आयुक्तांमार्फत पंतप्रधानांकडे केली. विभागीय आयुक्तांतर्फे उपायुक्त वर्षा ठाकूर यांनी समिती आणि मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारले.
मोर्चानंतर समितीतर्फे हे निवेदन देण्यात आले. वीरभद्र गादगे, अशोक मुस्तापुरे, सचिन खैरे, माधवराव टाकळीकर, बसवराज मंगरुळे, सुधीर सिंहासने, शिल्पाराणी वाडकर, राजेश विभुते, डॉ. प्रदीप बेंजरगे, अशोक मेनकुदळे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, दीपक उरगुंडे, आत्माराम पाटील, गोविंद डांगे, वीरेंद्र मंगलगे, सुनील हिंगणे, गुरुपाद पडशेट्टी, आनंद कर्णे, रोहित बनवसकर, गणेश वैद्य, अभिजित घेवारे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.
महासभेत घेतलेले ठराव
कर्नाटक सरकारने लिंगायत धर्म मान्यतेसाठी केंद्र सरकारला शिफारस केली, त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकारनेही लिंगायत धर्माला मान्यता देऊन केंद्र सरकारला शिफारस करावी.
कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून १५ हजार कार्यकर्ते कर्नाटकात जनजागृतीसाठी पाठविणार.
लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देणे म्हणजे हिंदूचे विभाजन करणे होईल, असे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच केले होते. सभेमध्ये यासंदर्भात निषेधाचा ठरावही घेण्यात आला.

Web Title: Lingayat religion will not be fit without acceptance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.