लिंगायत समाजाचे मंगळवारी राज्यभर धरणे आंदोलन
By Admin | Published: July 11, 2014 12:46 AM2014-07-11T00:46:12+5:302014-07-11T01:04:12+5:30
औरंगाबाद : लिंगायत समाजास अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा व ओबीसींचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे.
औरंगाबाद : लिंगायत समाजास अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा व ओबीसींचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येत असून १५ जुलै रोजी सकाळी १० वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात येणार आहेत. ही माहिती आज येथे पत्रपरिषदेत देण्यात आली. अन्य मागण्या अशा : महात्मा बसवेश्वराची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा, जि. सोलापूर येथे स्मारक उभारण्यात यावे, लिंगायत समाजासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा, संरक्षक भिंत व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, लातूर येथील विमानतळास जगद्ज्योती महात्मा बसवेश्वराचे नाव देण्यात यावे, माला जंगम, बेडा जंगम व जंगम यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यातील टाळाटाळ त्वरित थांबविण्यात यावी, जंगम जातीच्या वैधता प्रमाणपत्रासाठी १९५० पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी.
विश्वनाथ संगशेट्टी, शिवा लुंगारे, चंपावती झुंजरकर, विश्वनाथ स्वामी, भरत लकडे, शिवा खांडखुळे, नगरसेवक वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, चंद्रकांत जिबकाटे, आशिष लकडे, जगदीश कोठाळे, शिवलिंगप्पा वडाळे, सीताराम पारे, नारायणस्वामी काजळे, सुरेश वाळेकर, राजेश कोठळे, दीपक उरगुंडे, बसवराज जिभकाटे आदींची उपस्थिती होती.