लिप फास्टनर, सिद्दीकी संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:06 PM2017-11-29T23:06:43+5:302017-11-29T23:07:27+5:30

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम टी-२0 क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर व इक्बाल सिद्दीकी फॅन क्लब संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. इंद्रजित उढाण व शेख मुकीम हे दोघे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

 Lip fastener, Siddiqui team wins | लिप फास्टनर, सिद्दीकी संघ विजयी

लिप फास्टनर, सिद्दीकी संघ विजयी

googlenewsNext

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम टी-२0 क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर व इक्बाल सिद्दीकी फॅन क्लब संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. इंद्रजित उढाण व शेख मुकीम हे दोघे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
सकाळच्या सत्रात नेरळकर अकॅडमीविरुद्ध लिप फास्टनर संघाने प्रथम फलंदाजी करताना १४४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून इंद्रजित उढाण याने ३ षटकार व ४ चौकारांसह ६४ धावा केल्या. मदन राजू व राहुल पाटील यांनी अनुक्रमे नाबाद १७ व १५ धावा केल्या. नेरळकर अकॅडमीकडून कौस्तुभ केकाळे व कृष्णा पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात नेरळकर अकॅडमी संघाकडून मुकुल जाजूने एकाकी झुंज देत ३८ धावा केल्या. सोहेल पाटीलने २८, निहार वाकडीकरने १७ व आयुष पटेलने १२ धावांचे योगदान दिले. लिप फास्टनरकडून आशिष सूर्यवंशीने १२ धावांत ४ गडी बाद केले. राहुल पाटीलने ३ बळी घेतले.
दुपारच्या सत्रात अश्वमेध संघाविरुद्ध इक्बाल फॅन क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८२ धावा ठोकल्या. त्यंच्याकडून शेख मुकीमने चौफेर टोलेबाजी करताना ४ षटकार व ८ चौकारांसह ९२ धावांची वादळी खेळी केली. अश्वमेध नेवा संघाकडून संतोष फुलमाली याने २ गडी बाद केले. बालाजी काळेने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अश्वमेध संघ ८५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून किशोर राऊतने १६, सचिन कांबळेने १५ व सुनील तांबेने १२ धावा केल्या. उद्या, गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता अश्वमेध सी.सी. वि. लकी क्रिकेट क्लब आणि दुपारी १२.१५ वाजता फ्युचर सी.सी. मुंबई वि. श्रेयस क्रिकेट क्लब यांच्यात लढत होणार आहे. आज झालेल्या सामन्यात उदय बक्षी, गंगाधर शेवाळे, रफिउद्दीन नेहरी यांनी पंचांची भूमिका बजावली. गुणलेखन राजेश भिंगारे यांनी केले.

Web Title:  Lip fastener, Siddiqui team wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.