लिप फास्टनर, शहर पोलीस संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:39 AM2017-11-16T00:39:50+5:302017-11-16T00:41:27+5:30
प्रणव राजळे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर लिप फास्टनर संघाने व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेवरीज संघावर ७ गडी राखून मात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्रणव राजळे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर लिप फास्टनर संघाने व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेवरीज संघावर ७ गडी राखून मात केली. दुसºया लढतीत शहर पोलिसने पीडब्ल्यूडी संघावर ४ गडी राखून मात केली. औरंगाबादचा शैलीदार फलंदाज पंकज फलके, संदीप गायकवाड, राहुल जोनवाल यांची अर्धशतकी खेळी हेदेखील आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
एडीसीएच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन लाँगआॅफ आणि एक कव्हरला टोलेजंग षटकार ठोकणाºया पंकज फलकेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर युनायटेड ब्रेवरीज संघाने २0 षटकांत ५ बाद १७७ धावा ठोकल्या. पंकज फलके याने अवघ्या ५७ चेंडूंतच ३ उत्तुंग षटकार आणि १0 सणसणीत चौकारांसह नाबाद ९0 धावांची खेळी केली. संदीप गायकवाडने ५0 चेंडूंत ८ चौकारांसह ६२ धावा केल्या. लिप फास्टनर संघाकडून प्रणव राजळे याने २४ धावांत २ गडी बाद केले. राजेंद्र मदन याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात प्रणव राजळेच्या नेत्रदीपक अर्धशतकी खेळीच्या बळावर लिप फास्टनर संघाने विजयी लक्ष्य १८.२ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. दोन लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्हचे २ टोलेजंग षटकार व एक पूलचा मारलेला सनसणीत षटकार ठोकणाºया प्रणव राजळे याने अवघ्या ३९ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह ६१ धावांची निर्णायक खेळी केली. त्याला इंद्रजित उढाणने ४५ धावा काढून साथ दिली. राजेंद्र मदनने १८ व राहुल पाटीलने नाबाद १५ धावा केल्या. युनायटेड ब्रेव्हरीजकडून संदीप गायकवाडने २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात औरंगाबाद शहर पोलिस संघाविरुद्ध पीडब्ल्यूडी संघाने २0 षटकांत ८ बाद ११0 धावा केल्या. त्यांच्याकडून मनोज घोडकेने २२, योगेश राठीने २१ धावा केल्या. शहर पोलिस संघाकडून मिलिंद भंडारीने १४ धावांत ३ व शेख असीफने १९ धावांत २ गडी बाद केले. इम्रान खान व राहुल जोनवाल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलिस संघाने विजयी लक्ष्य १४.५ षटकांत ६ गडी गमावून १११ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून राहुल जोनवाल याने ३६ चेंडूंत २ षटकार व ७ चौकारांसह नाबाद ५७ धावांची निर्णायक खेळी केली. इम्रान खान १५ धावांवर नाबाद राहिला.