लिप फास्टनर विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:30 AM2017-11-25T00:30:03+5:302017-11-25T00:30:11+5:30
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर संघाने एसजीएसटी संघावर ७४ धावांनी मात केली.
औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत लिप फास्टनर संघाने एसजीएसटी संघावर ७४ धावांनी मात केली. दुसºया सामन्यात स्कोडा संघाने हायकोर्ट संघावर तब्बल ९१ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. आज झलेल्या सामन्यात राजू मदन आणि मंगेश गरड सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. इंद्रजित उढाण आणि सय्यद शुजा याची अर्धशतकी खेळी हेदेखील आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.
आज सकाळच्या सत्रातील लढतीत स्कोडा सांने १९.२ षटकांत सर्वबाद १५० धावा केल्या. त्यांच्याकडून मंगेश गरड याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ३४ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह सर्वाधिक ४८ धावा केल्या. संदीप खोसरेने २७ व संदीप राठोडने १८ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून देवानंद नांदेडकरने ३ तर सचिन जैस्वाल व मनोज शिंदे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात हायकोर्ट संघ १० षटकांत ५९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अमित वायकोस (१७) सचिन जैस्वाल (१४) हेच दुहेरी आकडी धावा पार करू शकले. स्कोडा संघाकडून योगेश भागवत, पवन कवाले व संदीप खोसरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात लिप फास्टनरने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १८५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून राजू मदन याने ५३ चेंडूंत १२ चौकारांसह ८१, इंद्रजित उढाणने ५३ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ८१ धावा केल्या. प्रणव राजळेने १५ व राहुल पाटीलने १० धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात एसजीएसटी संघ ६ बाद १२२ पर्यंतच मजल मारू शकला. त्यांच्याकडून सय्यद शुजाने एकाकी झुंज देताना ६५ चेंडूंत १० चौकारांसह ६८ धावांची खेळी केली. अभय करमारकरने १६ धावा केल्या. लिप फास्टनरकडून प्रणव राजळे याने २३ धावांत ३ गडी बाद केले. राजू मदन, राहुल पाटील व इंद्रजित उढाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.