औषधी कंपनीतून ८९ हजारांचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:11 PM2019-06-07T23:11:22+5:302019-06-07T23:11:31+5:30
वाळूज एमआयडीसीतील अंजता फार्मा कंपनीतील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८९ हजाराचे साहित्य लंपास केल्याची घटना बधुवारी उघडकीस आली.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील अंजता फार्मा कंपनीतील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८९ हजाराचे साहित्य लंपास केल्याची घटना बधुवारी उघडकीस आली.
वाळूज एमआयडीसीतील औषधी बनविणाऱ्या अंजता कंपनीच्या पाठीमागील बाजूस विविध साहित्य ठेवण्यासाठी तीन शेड बांधले आहेत. यातील एका शेडमध्ये इंजिनिअरिंगचे साहित्य, दुसºया शेडमध्ये स्पेन्ट सॉलवन्ट ड्रम तर तिसºया शेडमध्ये रिकामे ट्रम ठेवले होते. कंपनीतील कामगार जालिंदर पवानने ३ जून रोजी इंजिनिअरिंग साहित्य ठेवलेले शेड उघडून काम झाल्यावर कुलूप लावले होते.
५ जून रोजी कंपनीत पाहणी करीत असताना व्यवस्थापक संदीप धस यांना इंजिनिअरिंग साहित्य ठेवलेले शेड उघडे दिसून आले. त्यांनी पाहणी केली असता शेडचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी आत जावून साहित्याची पहाणी केली असता शेडमध्ये ठेवलेले एकूण ८९ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल गायब असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी संदीप धस यांच्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.