एसआरपीएफ भरतीत उमेदवारांची निवड यादी जाहीर
By Admin | Published: April 22, 2016 12:29 AM2016-04-22T00:29:33+5:302016-04-22T00:41:00+5:30
हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या एकूण ५० रिक्त पदांकरीता १८ एप्रिल रोजी लेखी परीक्षा सुरळीत पार पडली.
हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या एकूण ५० रिक्त पदांकरीता १८ एप्रिल रोजी लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. सदर लेखी परीक्षेतील गुणांआधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी २१ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्तेच्या निकषाआधारे निवड यादीप्रमाणे पात्र उमेदवारांची लवकरच वैद्यकीय तपासणी होणार असल्याची माहिती भरतीप्रमुख अप्पर पोलीस अधीक्षक विवेक मासाळ यांनी दिली.
हिंगोली येथे एसआरपीएफमध्ये पोलिस शिपायांच्या रिक्त पदांकरीता भरती प्रक्रिया पार पडली असून लेखी परीक्षेची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. लेखी परीक्षेस १०९९ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी १०६६ जणांनी परीक्षा दिली असून पात्र उमेदवारांची अंतिम यादी संबधित संकेतस्थळावर तसेच रा.रा.पो.बलगट क्र. १२ हिंगोली येथील मुख्य प्रवेशद्वारावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणी होणार आहे. निवड प्रक्रियेत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांना २४ तासाचा कालावधी देण्यात आला होता. यासंबधी एकाही उमेदवाराने आक्षेप नोंदविला नाही. या भरतीसाठी प्रमुख म्हणून विवेक मासाळ, कोचर हे अधिकारी काम पाहत आहेत.
जिल्हा पोलिस भरतीची अंतिम निवड यादी
हिंगोली: जिल्हा पोलिस दलात १४ शिपायांच्या रिक्त पदांसाठी भरती घेण्यात आली. पात्र उमेदवारांची तात्पुरती अंतिम निवड यादी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा पोलिस दलाच्या संबधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. १४ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या भरतीत निवड यादीवर काही आक्षेप असल्यास २४ तासाच्या आत लेखी स्वरूपात कळविण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांनी केले आहे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाची नोंदणी केली जाणार नाही. त्यानंतर के व्हा ही निवड यादी लावण्यात येणार आहे. पोलिस अधिक्षक कैलास कणसे, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अनिलसिंह राजपूत, पंडीत राठोड, श्रीखंडे, आयुब पठाण, अप्सर पठाण, ज्ञानेश्वर सरोदे, अशोक धामने, ओमप्रकाश भुजबळ, जयप्रकाश झाडे आदींनी भरती प्रक्रियेसाठी परिश्रम घेतले.