'आवडीचे संगीत ऐका, 'फिट' रहा..'; मनाचे नैराश्य दूर करण्याचा प्रभावी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 05:55 PM2021-03-26T17:55:05+5:302021-03-26T17:55:25+5:30

world music therapy day प्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च संगीताशी जोडलेली असते. त्यामुळे आपल्या आवडीचे शांत संगीत किंवा एखादे चित्रपटगीत ऐकल्यानेही मनावरचा ताण काही काळासाठी दूर होतो

'Listen to your favorite music, stay fit ..'; An effective remedy for depression | 'आवडीचे संगीत ऐका, 'फिट' रहा..'; मनाचे नैराश्य दूर करण्याचा प्रभावी उपाय

'आवडीचे संगीत ऐका, 'फिट' रहा..'; मनाचे नैराश्य दूर करण्याचा प्रभावी उपाय

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च संगीताशी जोडलेली असते.

औरंगाबाद : कोरोनाने आरोग्यासह अनेक समस्यांना जन्म दिला आहे. बिघडलेल्या आर्थिक घडीसोबतच अनेकांचे कौटुंबिक नातेसंबंधही कलुषित झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मानसिक त्रासांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. मनाची ही उलथापालथ थांबविण्यासाठी आणि विचारांना स्थिरता देण्यासाठी दररोज काहीकाळ तुमच्या आवडीचे संगीत ऐका आणि मानसिकदृष्ट्या 'फिट' रहा, असा सल्ला संगीतोपचार तज्ज्ञ देत आहेत. 

संगीतोपचार म्हणजे नुसते गाणे ऐकणे, असा अनेकांचा समज आहे. पण संगीतोपचार म्हणजे केवळ गाणे ऐकणे नव्हे. संगीतात जेव्हा वेगवेगळे प्रयोेग करून रुग्णांवर उपचार केले जातात, तेव्हा त्याला संगीतोपचार म्हणतात. प्रत्येक व्यक्ती ही जन्मत:च संगीताशी जोडलेली असते. त्यामुळे आपल्या आवडीचे शांत संगीत किंवा एखादे चित्रपटगीत ऐकल्यानेही मनावरचा ताण काही काळासाठी दूर होत असल्याचा किंवा आवडीचे संगीत कानावर पडताच शरीर आणि मन लगेचच पकड घेत असल्याचा अनुभव प्रत्येकानेच घेतलेला असतो. यातूनच संगीतोपचाराचे महत्त्व दिसून येते, असे संगीतोपचारतज्ज्ञ सांगतात.

कोरोना काळात उपयोगी 
जिल्हा सामान्य रुग्णालयातही कोरोना वॉर्डमध्ये काहीकाळ रुग्णांसाठी शांत संगीत लावून ठेवले जात होते. काही काळ आजार विसरून रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, असा उद्देशही त्यामागे होता.

मन हलके करण्याचे सामर्थ्य 
संगीतातले वेगवेगळे प्रयोग पर्किंसन, अल्झायमर, विस्मरण या आजारांमध्ये प्रभावी उपाय ठरू शकतात. लॉकडाऊनकाळात विशेष मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्यांच्या पालकांसाठी आव्हान होते. अशा मुलांना शांत करण्याचे, त्यांना त्यांचा आनंद मिळवून देण्याचे काम म्युझिक थेरपीने केले. विशेष मुले, वृद्ध व्यक्ती, मानसिकदृष्ट्या आजारी अशा सगळ्यांनाच संगीतोपचार उपयोगी ठरतो. मन हलके करण्याचे सामर्थ्य संगीताएवढे इतर कोणत्याही कलेत नाही.
- मंजूषा राऊत, म्युझिक थेरपिस्ट

संगीतोपचार केल्याने रुग्णाला नक्कीच फायदा
कोविड रुग्णांनाही संगीतोपचार देणे, ही सध्याच्या काळातली अतिशय उत्तम कल्पना ठरू शकते. मानसिक आजारांना नियंत्रणात ठेवण्याचे काम संगीत करते, हे अनेक अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. आजार कमी स्वरूपाचा असल्यास केवळ संगीतोपचाराने आणि आजाराची तीव्रता जास्त असल्यास औषधांसोबतच संगीतोपचार केल्याने रुग्णाला नक्कीच फायदा होतो.
- डॉ. प्रसाद देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय रुग्णालय
 

Web Title: 'Listen to your favorite music, stay fit ..'; An effective remedy for depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.