साहित्यिक इक्बाल मिन्नेंना अटक
By Admin | Published: November 14, 2014 12:50 AM2014-11-14T00:50:08+5:302014-11-14T00:57:17+5:30
औरंगाबाद : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इक्बाल मिन्ने यांना क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी पैठणगेट येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.
औरंगाबाद : प्रसिद्ध साहित्यिक डॉ. इक्बाल मिन्ने यांना क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी पैठणगेट येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर बीएसएनएलचे सीमकार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर केल्याच्या गुन्ह्यात मिन्ने पोलिसांना हवे होते.
कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील शेतकरी सखाहरी भाऊसाहेब गायकवाड यांच्या नावावर बीएसएनएलच्या कृषी प्लॅनचे सीमकार्ड डॉ. इक्बाल मिन्ने यांनी मिळविले होते. आपल्या नावावर दुसरेच कुणी तरी सीमकार्ड वापरत असल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठले आणि फसवणुकीची फिर्याद दिली. हे कार्ड डॉ. इक्बाल मिन्ने वापरत असून त्यांना ते कार्ड बीएसएनएलमधील अधिकारी रमेश दिवटेने दिल्याचे उघड झाले होते. त्यावरून या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात दिवटेला अटक झाली होती. डॉ. मिन्ने यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. तो फेटाळल्यापासून डॉ. मिन्ने पोलिसांना हवे होते. अखेर गुरुवारी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मिन्ने ‘एटीएस’च्या रडारवर!
वेरूळ शस्त्रसाठा प्रकरणातील अब्दुल नईम हा आरोपी काही दिवसांपूर्वी कोलकात्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. या आरोपीचे औरंगाबादशी कनेक्शन असल्याने औरंगाबाद एटीएस (दहशतवादविरोधी पथक) सतर्क झाले होते. एटीएसने नईमच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली.