जीवनदायीचा लाभ मिळेना
By Admin | Published: August 27, 2014 01:11 AM2014-08-27T01:11:31+5:302014-08-27T01:35:51+5:30
अकोला नि : परिसरातील रुग्णांना जीवदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आघाडी सराकरने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली,
अकोला नि : परिसरातील रुग्णांना जीवदायी योजनेचा लाभ मिळत नसल्याने रुग्णांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आघाडी सराकरने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली, परंतु या योजनेची अद्यापही म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याने गरजू व्यक्ती या योजनेपासून वंचित राहत आहेत. अनेकांना जादा पैसे मोजून खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. जीवनदायी योजनेचे कार्ड अनेक गरजूंना मिळाले असले पण त्या कार्डावर मोठया शस्त्रक्रिया होत नाहीत. सोनाग्राफी, सिटीस्कॅन, अशा महागड्या तपासण्या या कार्डावर होत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. रुग्णांची परिस्थिती व हाल लक्षा१ घेता या योजनेत काही बदल करून सर्वसामान्य आजारासाठी सुध्दा या कार्डाचा उपयोग व्हावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे.
जीवनदायी कार्ड फक्त कर्करोगासाख्या दुर्धर आजारासाठी कामी येते. या कार्डावर सर्वच आजारांसाठी मोफत उपचार करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहेत.
या कार्डाचा कोणकोणत्या आजारासाठी उपयोग होतो. कोणत्या दवाखान्यात आपले उपचार होतील, याबद्दल ग्रामीण भागात अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे.
त्यामुळे जीवनदायी योजनेबद्दल शासनाने पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, आणि सर्वसामान्याच्या हितासाठी काही बदल करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे. (वार्ताहर)