कर्जबाजारी शेतक-याने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:31 AM2018-02-16T01:31:03+5:302018-02-16T01:31:07+5:30

तालुक्यातील सफियाबादवाडी येथील शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी शेतात कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली. शिवाजी संपत भोसले (५५, रा. सफियाबादवाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. तालुक्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच असून वर्षभरात १७ शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले आहे.

 Livelihood Farmers End Life Quarter | कर्जबाजारी शेतक-याने संपविली जीवनयात्रा

कर्जबाजारी शेतक-याने संपविली जीवनयात्रा

googlenewsNext

वैजापूर : तालुक्यातील सफियाबादवाडी येथील शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गुरुवारी शेतात कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली. शिवाजी संपत भोसले (५५, रा. सफियाबादवाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकºयाचे नाव आहे. तालुक्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच असून वर्षभरात १७ शेतकºयांनी मृत्यूस कवटाळले आहे.
शिवाजी भोसले यांच्यावर दोन बँकांचे शेती व पीक कर्ज होते. याशिवाय खासगी बँकेचे एक लाख आणि दुचाकीसाठी फायनान्सचे पन्नास हजारांचे कर्ज होते. शेतात घर बांधण्यासाठी देखील त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि ते फेडणे अशक्य झाल्याने त्यांनी रात्री दोन वाजता कुणालाही न सांगता शेतात जाऊन पीक फवारणीसाठीचे किटकनायक प्राशन करून आत्महत्या केली. नातेवाईक व गावकºयांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात गट नं. ११७४ मध्ये गुरुवारी आढळून आला. शिऊर पोलिसांनी पंचनामा केला.
वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मयत शिवाजी भोसले यांच्या पश्चात आई वडील, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कर्जामुळे आणि त्याच्या परतफेडीच्या तगाद्यामुळेच भोसले यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा परिसरात होती.
अत्यल्प पावसामुळे उत्पादन घटल्यामुळे शेतीवर केलेला खर्चही पदरी पडत नसतानाच दुसरीकडे बँकेच्या अथवा सावकाराच्या कर्जाचा बोजा मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहेत.
दुष्काळाला सामोरा जाणाºया तालुक्यात भीषण वास्तव
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वैजापूर तालुका दुष्काळाला सामोरा जात आहे. दोन वर्षांपूर्वीच भीषण दुष्काळाला तोंड दिल्यावर यंदा पुन्हा दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. अत्यल्प पाऊस व सिंचनाचा अभाव यामुळे जानेवारी २०१७ ते आतापर्यंत तालुक्यात तब्बल १७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले असल्याची माहिती तहसीलदार सुमन मोरे यांनी दिली. म्हणजेच तालुक्यात दर महिन्याला एक ते दोन शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

Web Title:  Livelihood Farmers End Life Quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.