खुलताबाद तालुक्यात भीषण अपघात; एकाचा जागीच तर दुसऱ्याचा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 08:58 PM2021-01-10T20:58:54+5:302021-01-10T20:59:56+5:30
जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळाले नाहीत उपचार
खुलताबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टापरगांवजवळ रविवारी (दिं.10) सायंकाळी सहाच्या दरम्यान हतनुरकडुन येणाऱ्या मोटारसायकलला भरधाव छोटा हत्तीने उडवले. यात एक जण जागीच ठार,तर दुसरा उपचारासाठी नेेताना मरण पावला. जगन्नाथ भानुदास थोरात (45), राजेंद्र सुखदेव थोरात (40 ) दोघे राहणार देभेगांव ता.कन्नड अशी मृतांची नावे आहेत.
बाबत अधिक सविस्तर माहिती अशी, कन्नड तालुक्यातील देभेगांव येथुन जगन्नाथ थोरात व राजेंद्र सुखदेव थोरात हे हतनुरकडुन मोटारसायकल ( क्रमांक एम.एच.20 सी.ई.7237) ने येत असतांना खुलताबाद कडुन कन्नडकडे जाणाऱ्या पीकअपने (क्रमांक एम.एच.20 ई एल-0610 ) जोरदार धडक दिली. यात जगन्नाथ थोरात यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी राजेंद्र सुखदेव थोरात यांना हतनुर प्राथमिक केंद्रात नेले, माञ तेथे कुठलेही उपचार न मििळाल्याने त्यााना खुलताबादला आणत असतांना वेरुळ जवळच त्यांचा मृत्यू झाला.
उपचार न मिळाल्याने झाला मृत्यू
राज्य शासना अंतर्गत सुरु असलेली आपतकालीन वैद्यकीय सेवा म्हणुन 108 ही रुग्णवाहिका रस्त्यावर धावतात. माञ, सध्या ही सेवा चांगलीच विस्कळित झालेली आहे. आता तर विना वैद्यकीय अधिकारी या रुग्ण वाहिका धावतांना दिसताय. रविवारी (ता.10) टापरगांव अपघातात जखमीस वेळेवर उपचार सेवा मिळाली असती तर जीव वाचला असता. माञ वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सदरील रुग्णवाहिका अपघातग्रस्तस घेवुन टापरगांव ते खुलताबाद धावली.