कर्जमाफीचे ३४५९२ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:16 AM2017-08-27T00:16:35+5:302017-08-27T00:16:35+5:30

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.

 Loan Waiver 345 9 2 Application | कर्जमाफीचे ३४५९२ अर्ज

कर्जमाफीचे ३४५९२ अर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अद्यापपर्यंत ३४ हजार ५९२ शेतकºयांनी अर्ज सादर केले तर ३५ हजार ७१० शेतकºयांनी विविध केंद्रावर नोंदणी केली आहे. अर्ज भरलेल्या थकबाकीदार शेतकºयांना या योजनेचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात सन २०१६ चे ६५ हजार तर २०१७ चे ७८ हजार असे एकूण १ लाख ४३ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. विशेष म्हणजे थकबाकीदार कुटुंबातील एकाच व्यक्तीसाठी ही योजना लागू होणार आहे. योजनेतून दीड लाखांपर्यंत कर्ज माफ होणार आहे. १५ पानी असलेल्या कर्जमाफीच्या अर्जातील अटीशर्ती पूर्ण करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. तसेच योजनेच्या नावानेच असलेली वेबसाईट सर्वत्र खुली असल्याने संथगतीने चालत असल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत. केंद्रावर एक- एक अर्ज भरण्यासाठी जवळपास ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागत आहेत. कधी-कधी तर वेबसाईटच सुरु होत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यातच शेतकºयांचा संपूर्ण दिवस जात आहे.
नोंदणी व अर्ज भरण्यासाठी संपूर्ण महाराष्टÑात एकच वेबसाईट असल्यानेही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री केंद्रावर शेतकरी तळ ठोकून राहत आहेत. अर्ज भरण्यासाठी प्रथम शेतकºयांनी नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालीच तर शेतकरी अर्ज भरुन शकतो. विशेष म्हणजे मोबाईलवरही अर्ज भरण्याची सुविधा असल्याने आधार लिंक असलेले शेतकरी मोबाईलवरही अर्ज भरु शकतात.
आधार लिंक नसणाºयांना मात्र केंद्रावर जाण्याशिवाय पर्याय नाही. या आठवड्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतीची कामे बंद असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत. ती अजूनही कायम आहे.

Web Title:  Loan Waiver 345 9 2 Application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.