लॉकडाऊन हे चालू हे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:04 AM2021-03-28T04:04:22+5:302021-03-28T04:04:22+5:30

जिल्ह्यात न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, वर्तमानपत्र व डिजिटल मीडियाचे कर्मचारी, शासकीय व केंद्र सरकारचे कर्मचारी, शासन अंगीकृत संस्थांचे ...

Lockdown is on and off | लॉकडाऊन हे चालू हे बंद

लॉकडाऊन हे चालू हे बंद

googlenewsNext

जिल्ह्यात न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, वर्तमानपत्र व डिजिटल मीडियाचे कर्मचारी, शासकीय व केंद्र सरकारचे कर्मचारी, शासन अंगीकृत संस्थांचे कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, आशा वर्कर, नर्स, अंगणवाडी सेविका, मेडिकल शॉप व औषध निर्मिती कारखान्यांचे कर्मचारी, दूधविक्रेते, अत्यावश्यक सेवा- जसे की, कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणीपुरवठा व स्वच्छता कर्मचारी, मनपा व पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, सर्वेक्षण करणारे कर्मचारी या सर्वांना दुचाकी अथवा इतर वाहनाने फिरण्यास परवानगी असेल.

या सेवा राहतील बंद

- सार्वजनिक मैदाने, क्रीडांगणे, मोकळ्या जागांवर फिरण्यास बंदी.

- उपाहारगृह, लॉज, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, बाजार, मॉल, मार्केट बंद राहतील.

- केशकर्तनालये, सलून, मसाज पार्लर, स्पाची दुकाने बंद राहतील.

- खासगी वाहने- दोनचाकी, तीनचाकी, चारचाकी, मालवाहतुकीला बंदी.

- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्थाही बंदच राहतील.

-योग, कारखान्यांतील कामगारांना दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करावी लागेल.

- खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

- वर्तमानपत्र वितरण, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाची कार्यालये सुरू राहतील.

- कच्चा व पक्क्या मालाची सर्व प्रकारची माल वाहतूक सुरू राहील.

- अंत्यविधीला केवळ २० व्यक्तींनाच परवानगी असेल.

- रेल्वे, विमान प्रवासास परवानगी, मात्र प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक.

- न्यायालये, शासकीय कार्यालये शासन नियमानुसार सुरू राहतील.

- पेट्रोलपंप, गॅसपंप सुरू राहतील. पंपांवर शासकीय कर्मचाऱ्यांना पेट्रोल मिळेल.

- जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक बससेवादेखील पूर्णपणे बंद राहील.

- सर्व प्रकारचे बांधकाम, कन्स्ट्रक्शनची कामे पूर्णपणे बंद राहतील.

- करमणुकीची सर्व साधने, मंगल कार्यालये, धार्मिक सभा कार्यक्रमांना बंदी.

- शहरातील सर्व प्रकारच्या खासगी आस्थापना, कार्यालये बंद राहतील.

- सर्व धार्मिक स्थळे बंद, केवळ पुजाऱ्यांना विधिवत पूजा करता येईल.

* सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत या सेवांना मुभा

- किराणा मालाची ठोक दुकाने. बारा वाजेनंतर होम डिलिव्हरी.

- दूध विक्रीला मात्र सकाळी अकरा वाजेपर्यंतच मुभा असेल.

- मटण, चिकन, अंडी, मासे यांना बारा वाजेनंतर घरपोच सेवा देता येईल.

- भाजीपाला व फळांची विक्री सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत करता येईल.

- मॉल्स, डी मार्ट, बाजार, प्रोझोन मॉलमध्ये किराणा, भाजीपाला, अंडी, मासे, चिकन बारापर्यंतच.

- पाणीपुरवठ्याच्या टॅँकरलाही दुपारी बारा वाजेपर्यंतच मुभा.

- शेतीविषयक बी-बियाणे, खते, फवारणी, मशागतीची साधनांची दुकाने.

* उद्योगांसह आवश्यक सेवांना मुभा

- लॉकडाऊन काळात सर्व प्रकारचे उद्योग नियमानुसार चालू राहतील.

Web Title: Lockdown is on and off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.