Lockdown In Auranagabad : कोरोनाला रोखण्यासाठी शहरवासीयांचा निर्धार; लॉकडाऊनचा दुसरा दिवसही यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:55 PM2020-07-11T19:55:04+5:302020-07-11T19:56:08+5:30

शहरात कोरोना रुग्णांनी ८ हजाराचा आकडा पार केला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन व शहरवासीयांनी लॉकडाऊन यशस्वी करण्याचे मनातून निश्चित केल्याचे दिसते.

Lockdown In Auranagabad: Citizens determined to stop Corona; The second day of the lockdown was also a success | Lockdown In Auranagabad : कोरोनाला रोखण्यासाठी शहरवासीयांचा निर्धार; लॉकडाऊनचा दुसरा दिवसही यशस्वी 

Lockdown In Auranagabad : कोरोनाला रोखण्यासाठी शहरवासीयांचा निर्धार; लॉकडाऊनचा दुसरा दिवसही यशस्वी 

googlenewsNext
ठळक मुद्देदाट लोकवस्तीचा भाग वगळता अन्य कॉलनीतील घरे दिवसभर बंद

औरंगाबाद : शहरातील काही दाट वसाहती वगळता अन्य कॉलनीतील घरांचे दरवाजे दिवसभर बंद होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरवासीयांनी स्वत:ला घरात अक्षरश: कोंडूनच घेतले. यामुळे दुसऱ्या दिवशीही लॉकडाऊन दणदणीत पाळला गेला. विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा व त्यांच्या मदतीला महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर पाय रोवून उभे होते. येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी केली जात होती, दाट वसाहतींमध्ये पेट्रोलिंग करीत नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले जात होते.  न ऐकणाऱ्यांना फटके दिले जात होते. 

शहरात कोरोना रुग्णांनी ८ हजाराचा आकडा पार केला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन व शहरवासीयांनी लॉकडाऊन यशस्वी करण्याचे मनातून निश्चित केल्याचे दिसते. प्रशासनाला जनतेची साथ मिळते तेव्हा काय घडते त्याचे औरंगाबादेतील लॉकडाऊन  उत्तम उदाहरण ठरत आहे. उगाच फिरणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस यंत्रणा व त्याच सोबतीने महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे नागरिकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. सकाळी दूध खरेदीचा अपवाद वगळता बहुतांश कॉलनीत लोक घराचे दरवाजेही दिवसभर बंद करून ठेवताना दिसून आले. 

सिडकोतील  एन-१,  एन-२, एन-३, एन-४, एन-५,  एन-६, एन-७, एन-८ , एन-९, एन-११, तसेच  जवाहर कॉलनी, बौद्धनगर, गारखेडा परिसर, ज्योतीनगर, उल्कानगरी, शिवाजीनगर, गावातील समर्थनगर, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, एसबी कॉलनी, रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर, मिटकर कॉलनी आदी भागांत लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, शहरातील काही दाट वसाहतींमध्ये गल्लीबोळांत मात्र लोक गप्पा मारताना, फिरताना दिसून येत आहेत. यात बायजीपुरा, संजयनगर, कैलासनगर, जिन्सी, रोशनगेट परिसर, शाहबाजार, किराडपुरा, बुढीलेन या भागांत युवक व लहान मुले गल्लीत दिसून आली. यातील अनेक लोक मास्कही लावत नसल्याचे दिसून आले. या दाट वसाहतींवर पोलिसांनी शनिवारी लक्ष केंद्रित केले होते. पेट्रोलिंग सुरू होती, दुचाकीवरही पोलीस गस्त घालत होते. पोलीस नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करीत होते. पोलिसाची गाडी दिसली की, युवक घरात पळून जात व पोलीस गेले की पुन्हा बाहेर पडत होते. मात्र, शहरातील चौकाचौकांत चोख पोलीस बंदोबस्त असल्याने लॉकडाऊन दुसऱ्या दिवशीही यशस्वी ठरले. 

Web Title: Lockdown In Auranagabad: Citizens determined to stop Corona; The second day of the lockdown was also a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.