लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:02 AM2021-03-28T04:02:17+5:302021-03-28T04:02:17+5:30
सध्या जे अंशत: लॉकडाऊन चालू आहे, ते चांगले आहे. यासोबतच आणखी एक पर्याय म्हणजे ऑड आणि इव्हन डे चा ...
सध्या जे अंशत: लॉकडाऊन चालू आहे, ते चांगले आहे. यासोबतच आणखी एक पर्याय म्हणजे ऑड आणि इव्हन डे चा वापर करून बाजारातील, दुकानांमधील गर्दी कमी करणे. पोलिसांनी स्वयंसेवकांची मदत घेऊन कुणीही नियम मोडणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांनीही त्यांच्याकडून कोणताही नियम मोडणार नाही, याची काळजी घेतली, तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते.
- ॲड. रिना दोडया.
२. परिसर सील करा
संपूर्ण लॉकडाऊन हा योग्य पर्याय असू शकत नाही. त्यापेक्षा ज्या परिसरात कोरोना रुग्ण वाढत आहेत, तो परिसर कडक निर्बंध घालून सील करावा. यामुळे व्यापारावरही परिणाम होणार नाही, अर्थचक्रही सुरळीत राहिल आणि हातावर पोट असणाऱ्या गरिबांना कामही मिळेल. लॉकडाऊनचा गैरवापर करून भांडवलदार कामगार कपाती करून स्वत:चा फायदा करून घेत आहेत, याला आळा बसेल.
- पवन गायकवाड