लाॅकडाऊन ः रोजगार हिरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:05 AM2021-03-21T04:05:37+5:302021-03-21T04:05:37+5:30
-- कॅज्युअल काॅन्ट्रॅक्टचे त्यावेळी काम गेले, आता कायम कामगारांना भीती -- औरंगाबाद ः अचानक आलेली कोरोनाची साथ सर्वप्रथम हातावरचे ...
--
कॅज्युअल काॅन्ट्रॅक्टचे त्यावेळी काम गेले, आता कायम कामगारांना भीती
--
औरंगाबाद ः अचानक आलेली कोरोनाची साथ सर्वप्रथम हातावरचे पोट असणाऱ्यांना चटका लावणारी ठरली. सुरुवातीचे काही दिवस कंपन्यांकडून अर्धे पगार, खर्चापुरती मदत, सामाजीक संस्थांच्या मदतीवर कसेबसे घर चालले. मात्र, जवळटी सर्व जमापुंजी संपली. हाताला काम नाही म्हणून कोणत्याही परिस्थित गाव गाठण्यात अत्यंत हालअपेष्टा सोसत कामगार गावाकडे धावले. तर तिकडेही सीमाबंदी, गावबंदीत अडकले. यात अनेक अपघात घडले. रस्त्यावर पायी मिळेल त्या साधनाने जाणारे लोंढे, त्यांच्या व्यथा हृदय पिळवटून टाकणाऱ्या होत्या.
औरंगाबाद शेजारच्या औद्योगिक वसाहतीत लहान मोठ्या कंपन्यांत कॅज्युल काॅन्ट्रॅक्टवरच्या लोक मोठ्या संख्येने कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगार झाले. उद्योगक्षेत्रातील लाखाहून अधिक कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. त्यावेळी कायम असलेल्या लोकांना काहीसा आधार होता. मात्र, बांधकाम, हमाली, वेठबिगारी, घरकाम करणाऱ्याची व्यथा तर त्याहून निराळी होती. आता वर्षभराने पुन्हा त्याहून बिकट परिस्थितीची चाहुल लागल्याने कायम कामगारांनी धास्ती घेतली आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही. रोजगार जातो की काय अशी परिस्थिती आहे. असे भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते म्हणाले.
---
-आधी कंपन्यांच्या शिफ्ट कमी झाल्या
-उद्योगांची चाके थांबली, कामगारांच्या हातचे काम गेले
-दुकाने, व्यापारीपेठा बंद झाल्याने तेथील सेल्समन, कामगारांवर कुऱ्हाड
-वाहतूक बंद झाल्याने रिक्षाचालकांचे बेरोजगार
-कोरोनाच्या भीतीने घरकाम करणाऱ्या महिलांचे काम सुटले
-कडक लाॅकडाऊनमुळे बिगारी, हमाल, कामगार, कष्टकरी रस्त्यावर आले
-कंत्राटी नोकऱ्यावर गंडांतर, रोजंदार बेहाल